सीडीएस नियुक्ती लवकरच; समितीचा अहवाल संरक्षण मंत्र्यांकडे

सीडीएस नियुक्ती लवकरच; समितीचा अहवाल संरक्षण मंत्र्यांकडे
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर सरकार नव्या सीडीएसचा (सीडीएस नियुक्ती) शोध घेत असून एक समिती नियुक्त केली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सोपविणार आहे. लष्कराच्या तिन्ही दलाच्या वरिष्ठ कमांडर या समितीचे सदस्य असून काही नावांवर चर्चा सुरू असल्याची माहिती शुक्रवारी अधिकाऱ्यांनी दिली.

भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह अन्य ११ अधिकारी आणि सैनिक तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूमुखी पडले. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले.

रावत यांच्या मृत्यूनंतर नवे सीडीएस कोण असतील याबाबत अनेक नावांची चर्चा आहे. मात्र. सैन्यदल प्रमुख एम. एम. नरवणे यांच्या नावाची जोरात चर्चा आहे. तेच नवे सीडीएस असतील असे म्हटले जात होते. मात्र, अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. सीडीएस निवड प्रक्रिया ही तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांच्या समितीच्या शिफारसीनंतर होईल. अधिकाऱ्यांच्या समितीने दिलेल्या अहवालावर आधारित नावाच्या मंजुरीसाठी लवकरच हा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पाठविला जाईल.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्र्यांच्या मंजुरीनंतर सीडीएस नियुक्तीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी हे नाव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे विचारार्थ पाठविले जाईल.

या पदाच्या शर्यतीत लष्करप्रमुख एम. एम. नरवणे पुढे आहेत. अनुभव आणि सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची या पदावर नियुक्ती होऊ शकते. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात ते निवृत्त होणार आहेत.

वायूसेना प्रमुख एअर मार्शल व्ही. आर. चौधरी, नेव्हीप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. या दोन्ही प्रमुखांनी अनुक्रमे ३० सप्टेंबर आणि ३० नोव्हेंबर रोजी कार्यभार स्वीकारला. जर नरवणे यांची सीडीएसपदी नियुक्ती केली तर नव्या लष्करप्रमुखाचाही सरकारला शोध घ्यावा लागेल.

सीडीएस नियुक्ती : नवे सैन्यदल प्रमुख 'हे' असतील

सैन्यदल उपप्रमुख लफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती आणि नॉर्दन सैन्य कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी सैन्यप्रमुख पदाच्या रेसमध्ये आहेत. लेफ्टनंट जनरल मोहंती आणि लेफ्टनंट जनरल जोशी हे एकाच बॅचचे अधिकारी आहेत. नरवणे याच्यानंतरचे वरिष्ठ अधिकारी आहेत. हे दोघेही ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

जनरल, रावत हे भारताचे पहिले सीडीएस होते. त्यांनी मागील वर्षी या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सीडीएस सह त्यांनी संरक्षण मंत्रालयातील सैन्यांदर्भातील डीएमए विभागाचे सचिव आणि संरक्षण मंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news