Launch Event: Apple ने iPhone 14, Plus, Pro सह केली नवीन प्रॉडक्ट्स लॉंच, जाणून घ्या किंमत

Launch Event: Apple ने iPhone 14, Plus, Pro सह केली नवीन प्रॉडक्ट्स लॉंच, जाणून घ्या किंमत

पुढारी ऑनलाईन : Apple ने आपली iPhone 14 सीरीज लॉंच केली आहे. अॅपलने ते लॉंच करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्याला 'Far Out' असे नाव देण्यात आले होते. Apple ने या कार्यक्रमात iPhone 14 सीरीज अंतर्गत चार नवीन iPhone लाँच केले आहेत. या iPhones सिरीजमध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 pro, iPhone 14 pro Max चा समावेश आहे.

iPhone 14 साठी प्री-ऑर्डर ९ सप्टेंबरपासून, तर iPhone 14 ची विक्री १६ सप्टेंबरपासून सुरू होईल. तसेच iPhone 14 Plus ची विक्री ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ग्राहकांना iPhone 14 हा 79,900 रूपयांमध्ये तर iPhone 14 Plus हा 89,900 रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. हा आयफोन Apple online स्टोअरमधून किंवा Apple च्या अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करता येणार आहे.

IPhone 14
IPhone 14

iPhone 14 Pro ची किंमत $999 (अंदाजे 79,555 रूपये) पासून सुरू होते आणि iPhone 14 Pro Max ची किंमत $1,099 (अंदाजे 87,530 रूपये) असणार आहे. या सर्व मॉडेल्सची प्री-ऑर्डर ९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, १६ सप्टेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. iPhone 14 सिरीज ही ब्राइटनेस आणि रंग पुनरुत्पादनाच्या बाबतीत उत्तम असल्याचे म्हटले जाते. गेल्या वर्षीच्या आयफोन मॉडेलपेक्षा या आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लसमध्ये अधिक दर्जेदार आणि बॅटरीने सक्षम असल्याचे ऍपलचे म्हणणे आहे.

अॅपलच्या 'Far Out' या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये iPhone 14 सिरीजबरोबरच Apple Watch Series 8, Apple Watch Ultra आणि AirPods Pro Apple चे हे देखील प्रॉडक्ट्स लॉंच करण्यात आले आहेत. यामधील Apple Watch Series 8 मधील स्टँडर्ड अॅल्युमिनियम व्हर्जनसाठी 45,900 रुपये , स्टेनलेस स्टील व्हर्जनसाठी 74,900 रुपये आणि टॉप व्हेरिएंटसाठी 79,900 रुपये किंमत मोजावी लागणार आहे. तर यामधील Apple Watch Ultra या नवीन जनरेशन अॅपल वॉच SE ची सुरुवातीची किंमत 29,900 रुपये आहे. हे घड्याळ १६ सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. यामधील अॅल्युमिनियम व्हर्जन तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असेल.

AirPods Pro ही लॉन्च

Apple ने त्याच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये AirPods Pro ही लॉन्च करण्यात आले आहे. याची भारतातील किंमत 26,900 रुपये आहे, तर US मध्ये त्यांची किंमत $249 (सुमारे 19,900 रुपये) आहे. Apple ने सांगितले की नवीन एअरपॉड्ससाठी प्री-ऑर्डर ९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, 23 सप्टेंबरपासून यूएसमध्ये खरेदीसाठी हे विक्रीसाठी उपलब्ध होतील, परंतु भारतासाठी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पाहा लॉन्चिंग इव्हेंट व्हिडिओ :

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news