Apple Event 2023 : खुशखबर! आयफोन-१५ सीरीजसह वॉच लॉन्च, अँड्रॉईडच्या चार्जरने होणार चार्ज

Apple Event 2023 : खुशखबर! आयफोन-१५ सीरीजसह वॉच लॉन्च, अँड्रॉईडच्या चार्जरने होणार चार्ज
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Apple Event 2023 वर जगभरातील लोक लक्ष ठेवून असतात. विशेषत: Apple चाहते किंवा आयफोन खरेदी करू इच्छितात ते या इव्हेंटच्या प्रतिक्षेत होते. या सर्वांसाठी एक मोठी बातमी आहे. कंपनीचा आज एक मोठा इव्हेंट पार पडला. अॅपल वंडरलस्ट (Wanderlust) २०२३ असे या इव्हेंटचे नाव आहे. यामध्ये Apple iPhone 15 सीरीज आणि Apple Watch Series 9 लॉन्च करण्यात आली. या जागतिक लॉन्चसह, आयफोन 15 लगेचच भारतात उपलब्ध होणार आहे.

भारतीय वेळेनुसार अॅपलचा हा इव्हेंट (Apple Event 2023) मंगळवारी (दि. १२) रात्री 10:30 वाजता सुरू झाला. कॅलिफोर्नियातील Apple मुख्यालयाच्या 'स्टीव्ह जॉब्स थिएटर'मध्ये हा इव्हेंट पार पडला. अॅपलच्या वेबसाइट आणि यूट्यूबवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहण्यासाठी उपलब्ध होता. कंपनीचे मुख्यालय असलेल्या अॅपल पार्कमधून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केलेले होते. ब्लूमबर्गने एका अहवालात म्हटले आहे की, आयफोन 15 ची असेंब्ली भारतात होणार आहे आणि या जागतिक लॉन्चिंगनंतर लगेचच भारतात आयफोन 15 ची विक्री सुरू होईल.

कोणते मॉडेल्स लॉन्च करण्यात आले? Apple Event 2023 Highlight

कंपनीने iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max लॉन्च केले आहेत. iPhone 15 सीरीजसोबत Apple ने Apple Watch 9 आणि Apple Watch Ultra 2 देखील लॉन्च केले आहेत.

कसे असतील नवे आयफोन? How will the new iPhone 15 Series?

कंपनीने आपले iPhone 15 आणि iPhone 5 Plus मॉडेल लॉन्च केले आहेत. यात यापुढे obtrusive आणणारी खाच असणार नाही. प्रो मॉडेलप्रमाणे यात पिल शेपचे डायनॅमिक आयलंड असेल. डिस्प्लेची ब्राइटनेस 2000 nits असणार आहे. हे मागील मॉडेलपेक्षा दुप्पट फिचर्सचे मॉडेल असेल. iPhone 15 चा डिस्प्ले साईज 6.1 इंच आणि iPhone 15 Plus चा डिस्प्ले साईज 6.7 इंच असेल. दोन्ही मॉडेल सिरेमिक ग्लासद्वारे संरक्षित आहेत. विशेष म्हणजे नव्या मॉडेलमध्ये सी पोर्ट चार्जींग ऑफर केलेले आहे. यामुळे अँड्रॉईड मोबाईलचे सी-पोर्ट चार्जर याला सपोर्ट करतील.

नवीन आयफोन 15 मालिकेची किंमत किती आहे? How much does the new iPhone 15 series cost?

आयफोन १५ ची सुरुवातीची किंमत ७९९ डॉलर्स इतकी असणार आहे. तर आयफोन १५ प्लसची सुरुवातीची किंमत ही ८९९ डॉलर्स असणार आहे. कंपनीने आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्स देखील सादर केले आहेत. कंपनीने आयफोन १५ प्रो मॉडेल्समध्ये अ‍ॅक्शन बटण दिले आहे. ज्याचे मदतीने वापरकर्त्यांना अनेक कामे करता येणार आहेत. अजून कंपनीने भारतातील किंमती जाहीर केलेल्या नाहीत.

iPhone 15 चे फिचर्स

iPhone 15 मध्ये बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप वापरण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48MP आहे. कंपनीचा दावा आहे की याच्या मदतीने फोटो अधिक चांगल्या क्षमतेने क्लिक केले जाऊ शकतात. तसेच, हा फोन फोटोंग्रापीचा छंद आणखी प्रबळ करेल. यामध्ये वापरकर्त्यांना प्रकाश आणि तपशीलांचा परिपूर्ण संतुलन मिळेल. नेक्स्ट जनरेशन पोर्ट्रेट मोड उपलब्ध असेल. यासोबतच एक नवीन फोकस मोड उपलब्ध होईल. हा फोकस मोड कमी प्रकाशात आणि दिवसाच्या प्रकाशात चांगले काम करेल. नवीन स्मार्ट HDR चांगले फोटो क्लिक करण्यास देखील मदत करेल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news