Anushka Sharma : गुड न्यूज! अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट

anushka sharma-virat kolhi
anushka sharma-virat kolhi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती समोर आलीय. रिपोर्टनुसार, ती दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचे समजते. आता विराट कोहली पहिल्या बाळाच्या आगमनाप्रमाणे यावेळी औपचारिकपणे दुसऱ्या बाळाविषयी जाहीर करेल, असे म्हटले जात आहे. (Anushka Sharma) ११ जानेवारी, २०२१ रोजी अनुष्काने पहिल्या बाळाला जन्म दिली होता. विराट-अनुष्काच्या घरी नन्ही परीने जन्म घेतला होता. (Anushka Sharma)

संबंधित बातम्या – 

सूत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा प्रवास करत नाहीये किंवा कोणत्याही सामन्यात दिसत नाहीये. त्यामुळे तर्क लावला जात आहे की, अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार आहे. या गोड बातमीविषयी अद्याप अनुष्का किंवा विराटकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

'अनुष्का शर्मा – विराट कोहलीला मागील काही दिवसांत मुंबईतील एका रुग्णालयाबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. जिते दोघांनीही पॅपराझींना त्यांचे फोटो शेअर न करण्याची विनंती केली होती. शिवाय, हेदेखील म्हटले होते की, दोघे लवकरच स्वत: अधिकृतपणे घोषणा करतील. या कपलने आपल्या घरात गणपतीची स्थापनादेखील केली होती. त्याचे फोटोजदेखील सोशल मीडियावर अपलोड केले होते. भारतीय पोषाखात अनुष्का शर्मा खूप सुंदर दिसत होती.

अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वी 'चकदा एक्सप्रेस' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटामध्ये ती माजी भारतीय क्रिकेटर झूलन गोस्वामीच्या भूमिकेत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news