Nirmala Sitharaman : भारतात मुस्लिमांविरोधात हिंसाचार? अमेरिकेत निर्मला सीतारामन यांनी दिले उत्तर

File photo
File photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम समाजाची लोकसंख्या असून त्यामध्ये वाढ होत आहे. १९४७ च्या तुलनेत मुस्लिम लोकसंख्या वाढत असताना त्यांचे जीवन अडचणीत आहे. आणि सरकारच्या पाठिंब्यामुळे त्यांचे जीवन अधिक मुश्किल बनत चालले आहे, असा आरोप करणे चुकीचा आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांची स्थिती बिकट होत चालली आहे. त्यांची लोकसंख्या कमी होऊ लागली आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर किरकोळ आरोपासाठी फाशीसारख्या शिक्षा दिल्या जातात. पाकिस्तानातील मुस्लिमांची भारताशी तुलना केली असता भारतातील मुस्लिम चांगले जीवन जगत आहेत, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman)  यांनी केला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) वॉशिंग्टन डीसी, यूएस स्थित अमेरिकन थिंक टँक पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स (पीआयआयई) येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. अर्थमंत्री सीतारामन यांनी यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि विकास यावरही भाष्य केले.

दरम्यान, पीआयआयईचे अध्यक्ष अॅडम एस पोसेन यांनी पाश्चात्य वृत्तपत्रांमध्ये भारतातील विरोधी खासदारांच्या स्थितीवर आणि भारतातील मुस्लिम अल्पसंख्याकांवर हिंसाचार होत असल्याच्या बातम्यांबाबत अर्थमंत्री सीतारामन यांना प्रश्न केला. यावर अर्थमंत्र्यांनी उत्तर दिले.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ईशनिंदा कायद्याचा वापर बहुतेक प्रकरणांमध्ये वैयक्तिक सूडभावना पूर्ण करण्यासाठी केला जातो. पीडितांना लगेचच दोषी मानले जाते. भारतात सर्वत्र मुस्लिमांवर हिंसाचार होत असेल, तर हे विधान खोडसाळपणाचे आहे. २०१४ आणि आतापर्यंत मुस्लिमांची लोकसंख्या कमी झाली आहे का? जे लोक याबाबत अहवाल लिहितात. त्यांना मी भारतात येण्याचे निमंत्रण देईन. मी त्यांना होस्ट करीन. त्यांनी भारतात येऊन त्यांचे म्हणणे सिद्ध करावे.

निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, कोविडनंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर आली आहे. जी २० अध्यक्षपद , पीएलआई योजना, डब्ल्यूटीओ, हवामान बदल, जागतिक अर्थव्यवस्थेत स्थान निर्माण करणे, अशी आव्हाने भारताने पेलली आहेत. पाश्चात्य माध्यमांकडून भारताबद्दल नकारात्मकता पसरवली जात आहे. यावरही सीतारमण यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news