पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात सुरू असलेला वन-डे वर्ल्डकप आता अंतिम टप्यात आहे. स्पर्धेतील सेमी फायनल फेरीचे सामने स्पष्ट होत आहेत. सेमीफायनलमध्ये भारताविरूद्ध न्यूझीलंड खेळेल असे दिसत आहे. दरम्यान, रचिन रवींद्रने भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकरचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Rachin Ravindra)
पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणारे युवा खेळाडू स्पर्धेत आपली छाप सोडत आहेत. त्यांनी आपल्या शानदार कामगिरीमुळे सर्वाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. यातील एक युवा खेळाडू म्हणजे न्यूझीलंडचा रचिन रवींद्र. रचिनने पहिल्यांच वर्ल्डकप खेळताना भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.
न्यूझीलंडचा युवा स्टार अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रने भारतात सुरू असलेल्या वन-डे वर्ल्डकपमध्ये आपली शानदार खेळी कायम राखली आहे. रचिन वन-डे वर्ल्डकप 2023मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने 9 सामन्यात 565 धावा केल्या आहेत. यामध्ये रचिनने श्रीलंकाविरूद्धच्या सामन्यात 42 धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे सचिन तेंडूलकरला मागे टाकत तो वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. (Rachin Ravindra)
सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावरून रचिनचे नाव ठेवण्यात आले आहे. त्याचे वडील सचिन आणि राहूल यांचे मोठे चाहते होते. त्याचे वडील रवी कृष्णमूर्ती हे इंजिनियर होते. ते बंगळूरमध्ये राहत होते. यानंतर ते न्यूझीलंडला गेले. तिथे रचिनचा जन्म झाला. आज याच शहरात या रचिनने वर्ल्डकपमध्ये मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तो वन-डे वर्ल्डकपच्या पदार्पणाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
रचिन रवींद्र न्यूझीलंडसाठी प्रथमच वन-डे वर्ल्डकप खेळत आहे. वयाच्या २५ व्या वर्षी रचिन वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यासह रचिनने टीम इंडियाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला आहे. 1996 साली झालेल्या वन-डे वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडुलकरचे वय २५ पेक्षा कमी होते. त्यावेळी त्याने स्पर्धेत 523 धावा केल्या होत्या. तर रचिनने 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत 565 धावा केल्या आहेत.
हेही वाचा :