Manoj Jarange Patil | मराठा समाजाला ‘ओबीसी’त घ्या आणि शक्य झाल्यास ‘ओबीसी’चे आरक्षण वाढवा : मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil | मराठा समाजाला ‘ओबीसी’त घ्या आणि शक्य झाल्यास ‘ओबीसी’चे आरक्षण वाढवा : मनोज जरांगे पाटील

पुढारी ऑनलाईन : मराठा आरक्षण संदर्भात सरकारने लिखित टाईम बॉन्ड द्यावा. मराठवाड्यातील जास्तीत जास्त लोकांना आरक्षण देण्यात यावे. सरकारला काही अडचणी असल्यास मराठा समाजाला 'ओबीसी'मध्ये घ्या आणि शक्य झाल्यास 'ओबीसी'चे आरक्षण वाढवा. पण आम्हाला तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारकडे केली आहे. मनोज जरांगे पाटील हे आज(दि.१०) छ.संभाजीनगर येथील रूग्णालयातून माध्यमांशी बोलत होते.

पुढे ते म्हणाले, कुणबी नोदी तपासण्याचं काम वेगाने व्हावं. यासाठी सरकारने कुणबी नोंदी तपासण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे. आम्हाला २४ डिसेंबरच्या आतमध्ये मागणीनुसार मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे सरकारने युद्धपातळीवर काम करावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष द्यावे असेही ते म्हणाले. दरम्यान त्यांचा महाराष्ट्र दौरा हा कोल्हापूरातून सुरूवात होणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news