अनिल परब यांना धक्का : दापोली रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना ‘ईडी’ कोठडी

सदानंद कदम
सदानंद कदम

पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत सक्‍तवसुली संचालनालय ( ईडी ) कोठडी सुनावण्यात आली आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट बेकायदा बांधकाम प्रकरणी 'ईडी' पथकाने शुक्रवारी (दि.१०) पहाटे त्यांना ताब्यात घेतले होते. सदानंद कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे भाऊ आहेत. नुकत्याच खेड येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी त्यांचा सक्रीय सहभाग होता.

सदानंद कदम यांची सक्तवसुली संचालनालय (इडी) कडून काही महिन्यांपासून चौकशी सुरू केली होती. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ही चौकशी सुरू असल्याचं समजतं. दापोलीतील वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्टसोबत सदानंद कदम व ठाकरे गटातील माजी मंत्री अनिल परब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या संशयावरुन ही चौकशी सुरू आहे.

गुरुवारी दि.९ रोजी खेड येथील एका रुग्णालयात सदानंद कदम यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया देखील झाल्याचे समजते. त्यानंतर लगेचच सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतल्याने हा एक चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news