Animal Actors Fees :’ॲनिमल’साठी ‘या’ अभिनेत्यांनी वसूल केली तगडी रक्कम

anil kapoor
anil kapoor

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्या 'अ‍ॅनिमल' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या टीझरने इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. आता चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. (Animal Actors Fees) या आगामी सिनेमॅटिक चित्रपटात अनिल कपूर अनोख्या भूमिकेत दिसणार आहेत. बलबीर सिंगच्या पात्रात अनिल कपूर दिसणार असून संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित आणि T-Series आणि Cine1 Studios द्वारे निर्मित ' अ‍ॅनिमल ' मध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, तृप्ती दिमरी, शक्ती कपूर आणि इतर अनेक कलाकारांचा खास भूमिका आहेत. (Animal Actors Fees)

यापूर्वी रिलीज झालेल्या पोस्टर्सने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली असून ' अ‍ॅनिमल' 1 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. चाहते पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर त्याची जादू पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या टीझरने चाहत्यांना आश्चर्यचकित केले असून हा एक उत्तम चित्रपट असणार यात शंका नाही. अनिल कपूरच्या AKFCN निर्मित "थँक यू फॉर कमिंग" या चित्रपटाचा अलीकडेच टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला आणि त्याला उस्फीर्त प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट ६ ऑक्टोबर, २०२३ रोजी रिलीज होणार आहे.
आता पाहुया कलाकारांनी किती मानधन घेतले?

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

अनिल कपूर

या चित्रपटासाठी अनिल कपूर यांनी २ कोटी मानधन घेतल्याचे समजते. अनिल कपूर यांनी रणबीरच्या रागीट वडिलांची भूमिका साकारली आहे.

रणबीर कपूर

रणबीर कपूरने मुख्य नायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला एनिमल असे नाव देण्यात आले. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी त्यांनी रिपोर्ट्सनुसार, ७० कोटी रुपये चार्ज केले आहेत.

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदानाने रणबीर कपूरच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. रिपोर्ट्सनुसार, ४ कोटी रुपये चार्ज केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

बॉबी देओल

चित्रपटामध्ये बॉबी देओलने विलेनची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी रिपोर्ट्सनुसार, त्यांनी ४ कोटी रुपये चार्ज केले.

राघव बिनानी

अभिनेता राघव बिनानीने ५० लाख रुपये घेतल्याचे समजते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news