बीड : संतप्त मराठा आंदोलकांनी सोळंके यांच्या घरानंतर माजलगाव नगरपरिषदेलाही लावली आग

बीड : संतप्त मराठा आंदोलकांनी सोळंके यांच्या घरानंतर माजलगाव नगरपरिषदेलाही लावली आग

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले असून सोमवारी (दि.३०) सकाळी अकराच्या सुमारास संतप्त मराठा आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावली. यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा माजलगाव नगरपरिषदेकडे वळवला. नगरपरिषद कार्यालयाला देखील संतप्त मराठा आंदोलकांनी आग लावली असून आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याची भीती व्यक्त होत आहे.

मराठा समाजाच्या आंदोलकांनी माजलगाव नगरपरिषदेला आग लावली. आंदोलकांनी नगरपरिषदेमध्ये जाऊन आग लावली, त्यानंतर नगरपरिषदेतील सर्व संगणकांची मोडतोड केली. यामध्ये पालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news