गेले काही दिवस अंधेरी पूर्व विधानसभा पाेटनिवडणूक चर्चेत आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात लढत होईल असं चित्र होते. एकीकडे ऋतुजा लटके यांच्या राजीनामा मंजुरीत अडथळे येत होते. अखेर त्यांचा राजीनामा मंजूर झाला. आणि निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला. दोन्ही गटाकडून उमेदवारीचे अर्ज शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरण्यात आले. अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, त्यानंतर त्यांच अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माघारीबाबत पत्र लिहणं., त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आज नागपूरमध्ये अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीतील भाजप माघार घेणार अशी घोषणा अशा घडामोडी घडल्या.