पंतप्रधान मोदींच्‍या जंगल सफारीवर आनंद महिंद्रांचे ट्विट ठरले चर्चेचा विषय

पंतप्रधान मोदींच्‍या जंगल सफारीवर आनंद महिंद्रांचे ट्विट ठरले चर्चेचा विषय

पुढारी ऑनलाईन डेस्क : आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांच्या मजेशीर ट्विटमुळे अनेकदा सोशल मीडियावर महिंद्रा हा शब्द ट्रेंडिंगवर असतो. आज देखील त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांचे हे फोटो पाहिल्यानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांचा आनंद गगनात मावेना अशी परिस्थिती निर्माण झाली. या फोटोसोबत त्यांनी काही कॅप्शन देखील दिलेले आहे. त्यांच्या या ट्विटची चर्चा खूप होत आहे. मात्र आनंद महिंद्रा यांना मोदींचे फोटो पाहून इतका आनंद का झाला असा प्रश्न देखील अनेकांना पडला असेल. जाणून घेऊया विषयी अधिक माहिती.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेले फोटो हे कर्नाटकमधील बंदीपूर व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचे आहेत. त्यांनी ट्विटरवर हे फोटो शेअर करून आनंद व्यक्त केला आहे. 'प्रोजेक्ट टायगर'ला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यावेळी जंगल सफारीचा आनंद घेत असतानाचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हयरल होत आहे. यातील काही विशेष असे फोटो महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. त्याचबरोबर या फोटोंना पाहून त्यांनी व्यक्त केलेला आनंद हा चर्चेचा विषय ठरला आहे.

मोदींनी कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाची २० किलोमीटर इतकी जंगल सफारी जीपने केली. या जंगल सफारीमध्ये त्यांनी महिंद्रा कंपनीच्या जीपमधून पर्यटन केल्याचे दिसून आले. मोदींचे व्हायरल होत असणारे हे फोटो सोशल मीडियावर देखील खूप चर्चेत आहेत. पीएम मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून जंगल सफारीचा फोटो ट्विट केला. हा फोटो शेअर करत त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 'बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात सकाळ घालवली आणि भारतातील वन्यजीव, नैसर्गिक सौंदर्य आणि विविधतेची सुंदर झलक पाहिली.

पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण जंगल सफारी केलेले हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहेत. विशेष म्हणजे पीएम मोदींनी महिंद्राच्या जीपमधून जंगल सफारी केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमधील काही फोटो आनंद महिंद्रा यांनी शेअर करत एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत केले. यावर त्यांनी लिहिले आहे की, "मला असे वाटते की हा पंतप्रधान यांच्या बंदिपूर भेटीमधील हे सर्वोत्तम फोटो आहेत. महिंद्रा यांच्या आजच्या पोस्टवर ट्विटर यूजर्स आपली प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news