मोदींनी घेतली ‘द एलिफंट व्हिस्पर्सच्या’ रघु हत्तीचे पालक जोडपे बोमन व बेल्लीची भेट

pm modi
pm modi

पुढारी ऑनलाइन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्कर विजेत्या लघुपटातील रघु हत्तीचे पालक जोडप्याची भेट घेतली. त्यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी हत्तींना ऊस खाऊ घातला. याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी पंतप्रधानांच्या पोषाखाची आणि त्यांच्या लूकची चर्चा होत आहे.

कर्नाटकमधील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला आज (दि. ९) ५० वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सहभागी झाले होते. यावेळी मोदींचे हस्ते 'वाघ संवर्धनासाठी अमृत कालचे व्हिजन' आणि 'इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स' (IBCA) लाँच करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाघांची संख्या जाहीर केली. 2022 पर्यंत भारतात वाघांची संख्या 3 हजार 167 इतकी नोंदवली गेली आहे. भारताने केवळ वाघांना वाचवले नाही, तर त्यांची संख्या वाढण्यासाठी अनुकूल पर्यावरण निर्माण केले आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

कोण आहेत बोमन आणि बेल्ली

गुनीत मोगाने हे निर्माता असलेल्या  द एलिफंट व्हिस्परर्सने (The Elephant Whisperers) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कारावर मोहर उमटवलेली आहे. या माहितीपटात तामिळनाडूमधील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील एका कुटुंबाची हृदयाला भिडणारी गोष्ट दाखवण्यात आली आहे.  या कुटुंबातील सदस्य अनाथ हत्तींना दत्तक घेतं आणि त्यांची कस संगोपन करतं हे दाखवल आहे. मानव आणि प्राणी यांच्यातील निःस्वार्थ प्रेमाचे चित्रण करते. अनाथ हत्ती रघूची काळजी घेण्याची जबाबदारी पती-पत्नीने घेतली आहे. रघूला वाचवण्यासाठी हे जोडपं किती कष्ट घेतं हे माहितीपटात दाखवण्यात आलं आहे.

या लघुपटात रघु या अनाथ हत्तीचा सांभाळ करणारे जोडपे आहे बोमन आणि बेल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या हाताने हत्तीला ऊस खाऊ घातला.

हे ही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news