पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेले देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra Tweet) यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर करून लोकांना सावध केले आहे. आनंद महिंद्रा आपल्या ट्विटद्वारे तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचे फायदे आणि अनेक प्रेरणादायी घटनांची ओळख करून देत असतात; पण यावेळी त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) बद्दल सावधानता बाळगा अशा आशयाचे ट्विट केले आहे.
आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विटमधून (Anand Mahindra Tweet) म्हणाले की, जरी 'एआय' हे तंत्रज्ञान विविध क्षेत्रांसाठी फायदेशीर असली तरी त्याचे घातक परिणामही आहेत. याचे उदाहरण देणारा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला. या व्हिडिओमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे लोकांना कसे फसवले जाऊ शकते याची माहिती दिली.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने AI च्या आधारे कोणीही चुकीचे आणि बनावट व्हिडिओ कसे बनवू शकते याबद्दल सांगितले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने हा बनावट व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये एखाद्या व्यक्तीचा चेहरा कसा बदलू शकतो, याबद्दल माहिती दिली आहे.
या व्हिडिओमध्ये AI च्या गैरवापराची काही उदाहरणेही सांगण्यात आली आहेत.आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने व्हिडिओत बोलत असणाऱ्या व्यक्ती कधी विराट कोहली तर कधी शाहरुख खान तसेच अन्य काही अभिनेते यांचे चेहरे बदलत असल्याचे दिसून येते. हॉलिवूड अभिनेता आणि आयर्न मॅन हिरो रॉबर्ट डॉनी जूनियरचा चेहरादेखील या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे. हा व्हिडिओ 8 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे तसेच त्यावर अनेक कमेंट देखील करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :