hasseen dillruba : हसीन दिलरुबाची २ वर्ष, फिर आयी हसीन दिलरुबा येणार?

anand l rai
anand l rai

चित्रपट निर्माते आनंद एल राय हे कलर यलो प्रॉडक्शन्स या बॅनरखाली नवीन कलागुणांना, ग्राउंडब्रेकिंग कथांना पाठिंबा देण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात. (hasseen dillruba) या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून अनेक हटके चित्रपटाची निर्माती झाली. शुभ मंगल सावध, मुक्काबाज, मनमर्जियां आणि तुंबाड यासह इतर अनेक प्रतिभावान चित्रपटांचा यात समावेश आहे. 2021 मध्ये आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शनने हसीन दिलरुबा हा बहुचर्चित चित्रपट रिलीज केला आणि आज या चित्रपटाची २ वर्ष होत आहेत. (hasseen dillruba

या चित्रपटाने रोमँटिक थ्रिलर्सचा चा अनोखा प्रवास दाखवला. हसीन दिलरुबाने अलीकडेच चित्रपटाची २ वर्ष साजरी केली. २ जुलै २०२३ रोजी त्याच्या डायरेक्ट-टू-डिजिटल रिलीजपासून दोन वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. विनील मॅथ्यू दिग्दर्शित या चित्रपटात तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि हर्षवर्धन राणे यांच्या अनोख्या भूमिका होत्या. हसीन दिलरुबा त्याचा दुसरा वर्धापन दिन साजरा करत असताना त्याच्या बहुप्रतीक्षित सीक्वल, फिर आयी हसीन दिलरुबा लवकरच येणार असल्याच्या चर्चा आहेत.

फिर आयी हसीन दिलरुबामध्ये तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसीची धमाकेदार केमिस्ट्री परत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आगामी चित्रपटात सनी कौशल देखील आहे आणि त्याचे दिग्दर्शन जयप्रद देसाई यांनी केलं असल्याचं समजतंय.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news