पुढारी ऑनलाईन डेस्क : रांझणा च्या दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने " तेरे इश्क में " ची खास घोषणा करण्यात आलीय. दूरदर्शी चित्रपट निर्माते आनंद एल राय हे प्रेक्षकांना नेहमीच वेगळ्या थाटणीचे सिनेमे देत असतात. (Tere Ishk Mein) त्याच्या अनोख्या कथा आणि दिग्दर्शनाची दूरदृष्टी यामुळे त्यांचा प्रत्येक चित्रपट या खास असतो. प्रेक्षकांना मोहित त्यांची शैली सर्वदूर आहे. आनंद एल राय यांच्या दिग्दर्शन प्रवासातील सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे " रांझणा " या चित्रपटाने आज तब्बल 10 वर्ष पूर्ण केली असून आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. (Tere Ishk Mein)
या सुपरहिट चित्रपटाची 10 वर्ष पूर्ण करत असताना आनंद एल राय त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. "तेरे इश्क में" हा नवाकोरा चित्रपट ते प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. ही फक्त एक घोषणा नसून यात अजून एक खास सरप्राईज आहे ते म्हणजे प्रतिभावान अभिनेता धनुष या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचं समजतंय.
आनंद एल राय म्हणतात, "धनुषसोबत 'तेरे इश्क में' या आमच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी आज सारखा खास दिवस आला आहे हा एक अनोखा योगायोग आहे. 'रांझणा' हा एक चित्रपट नसून ती एक भावना आहे. माझ्या हृदयात या चित्रपटासाठी विशेष प्रेम आहे. जगभरातील चाहत्यांकडून या चित्रपटा साठी मिळणार प्रेम नक्कीच हृदयस्पर्शी आहे."
आनंद एल राय यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून उल्लेखनीय फिल्मोग्राफी केली आहे ज्यात "तनु वेड्स मनू," "अतरंगी रे," "गुडलक जेरी," "अॅक्शन हिरो," "हॅपी भाग जायगी, यांसारख्या अविस्मरणीय चित्रपटाचा समावेश आहे. ""न्यूटन," "तुम्बाड," अश्या असंख्य चित्रपटात त्यांनी आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवून दिली आहे.