Chocolate ‘sweet’ car : चॉकलेटची ‘स्वीट’ कार!

Chocolate 'sweet' car
Chocolate 'sweet' car

लंडन : हल्ली चॉकलेटपासूनही अनेक सुंदर कलाकृती बनवल्या जात आहेत. त्यापैकी काही कलाकृती तर अगदी थक्क होण्यासारख्याच असतात. एका कलाकाराने आता अशीच एक चॉकलेटची कार (Chocolate 'sweet' car ) बनवली आहे. ही कार बनवत असतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियातही व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तो शेफ सुरुवातीला एका सपाट बटर पेपरवर मेल्ट केलेले चॉकलेट (Chocolate 'sweet' car) पसरवताना दिसत आहे. त्यानंतर दुसर्‍या बटर पेपरवर कारचे पूर्ण डिझाईन काढून घेतले आणि चॉकलेटला कारच्या विविध पार्टचा आकार दिला. अतिशय हळूवारपणे व्यवस्थित फिनिशिंगसह तो चॉकलेटला आकार देत आहे. चॉकलेटपासून तयार केलेले कारचे सर्व पार्ट तो जोडून घेतो. कारचे मॉडेल बनवतो यानंतर कारला हव्या असणार्‍या कलरचे चॉकलेट घेऊन "चॉकलेट कार" कव्हर तयार करतो.

सर्वात शेवटी नंबर प्लेट लावून चॉकलेट कार (Chocolate 'sweet' car) पूर्ण करतो. यानंतर दिसणारी ही कार चॉकलेटपासून बनवली आहे यावर विश्वासच बसत नाही. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शेफने ही 'चॉकलेट कार' बनवणं दिसतं तितकं सोपं नसल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ चॉकलेटप्रेमींच्या चांगलाच पंसतीस उतरला आहे. 'चॉकलेट कार'च्या व्हिडीओला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news