पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी ते बॉलिवूडपर्यंत मजल मारणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने हायस्लिट गाऊनमध्ये जलवा दाखवला आहे. डार्क ब्राऊन रंगाच्या ड्रेसमध्ये अमृताने सुंदर फोटोशूट केलं आहे. निमित्त होतं गोव्यातील इफ्फी २०२२ महोत्सवाचं. या व्हिडिओमध्ये ती शिमरी गाऊन परिधान केलेली दिसते. (Amruta Khanvilkar)
अमृताने काही फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले आहेत. या फोटोमध्ये ती डार्क ब्राऊन कलर शिमरी हाय स्लिट गाऊन घातलेली दिसते. केसांचा बन घालून तिने हेअरस्टाईल केलेली दिसते. त्यावर सिल्व्हर रंगाचे लॉन्ग ईअरिंग्ज घातलेली ती दिसतेय. तिच्या या फोटोंमध्ये आणि व्हिडिओमध्ये अनेक अदा पाहायला मिळतात. तिने पहिल्या फोटोंना #upcloseandpersonal #redcarpet look for @iffigoa अशी कॅप्शन लिहिलेली दिसतेय. दुसऱ्या फोटोंना For @iffigoa #redcarpet अशी कॅप्शन दिली आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओला In difficult times, fashion is always outrageous अशी मस्त कॅप्शन दिलेली दिसतेय.
अमृताच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतेय. Beautiful, Stunning ❤️❤️❤️, Woahhh hottest human ever❤️, ????, ???, ?????, Atta kay aiktay!!????❤️?, Slayer?, Slayyyyy queen ?❤️, Amruta ma'am your birthday is coming in 3 days Aaj chandramukhi movie baghitla khup chan acting keliye tumhi best wishes to you always stay happy and healthy always ❤️❤️❤️❤️❤️, GORGEOUS MAM ❤️, Electrified ??❤️ अशा कमेंट्स पाहायला मिळतात. तिच्या प्रत्येक अदा, बोल्ड पोझ पाहण्यासारखे आहेत.
अमृताने आतापर्यंत अनेक हिट मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. राजीसारख्या बॉलिवूडपटात काम करून तिने वाहव्वा मिळवली होती. तर नुकताच तिची चंद्रमुखी चित्रपटातील भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली. या चित्रपटातील तिचे चंद्रा हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले आहे.
हेही वाचा :