Kaun Banega Crorepati 14 : बिग बींना जास्त उंचीमुळे खावा लागला होता मार

Kaun Banega Crorepati 14 : बिग बींना जास्त उंचीमुळे खावा लागला होता मार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेता आणि बिग बी अमिताभ बच्चन सध्या छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती सीझन 14' ( Kaun Banega Crorepati 14 ) शो होस्ट करत आहेत. या शोमधून कायमच नवनवीन गोष्टीचा उलगडा होत असतो. सहभागी झालेल्या प्रत्येक शोमधील स्पर्धकांची वैवाहिक जीवनातील धक्कादायक खुलासे समोर येत असतात. सध्या बीग बी अमिताभ बच्चन यांच्या उंचीमुळे ते सतत मार खात असल्याची माहिती समोर आली आहे.

अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती 14' (Kaun Banega Crorepati 14 ) या शोमध्ये काश्वी शर्मा नावाच्या स्पर्धकाला बिग बीच्या समोर हॉटसीटवर बसण्याची संधी मिळाली. यानंतर बिग बींनी काश्वी शर्मा यांच्या आवडी-निवडी आणि नापसंतीचे रिपोर्ट कार्ड तपासले. यात तिला तिच्या कमी उंचीवरून प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देताना वर्गात सर्वात लहान मीच होते. असे उत्तर दिलं गेलं. यानंतर या प्रश्नावरूनच बिग बींच्या उंचीकडे मोर्चा वळला.

अमिताभ बच्चन यांची उंची 6.25 फूटांची आहे. या उंचीवर बोलताना ते म्हणाले की, 'जास्त उंचीमुळे मला शाळेत असताना खूपच त्रास सहन करावा लागला. तर कधीकधी मारदेखील खावा लागला होता. शाळेत असताना बॉक्सिंगला खूप महत्त्व होते आणि माझी उंची जास्त असल्याने मला कायमच मोठ्या गटाच्या यादीत समाविष्ट करण्यात येत होते. त्यामुळे शाळेत मला मार खावा लागत होता.'

यानंतर बिग बी सर्वाधिक फोन वापरण्याच्या सवयीबद्दल मुलांना त्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. या शोत काश्वी शर्मा हिने 6 लाख 20 हजार रूपये जिंकले. तर अमिताभ यांना बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात उंच व्यक्ती म्हणून ओळखले जाते.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news