राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दाेनवरील अडथळे हटवावेत : मणिपूरमधील नागरिकांना गृहमंत्री अमित शहांचे आवाहन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. (संग्रहित छायाचित्र)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. (संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा एकदा बिघडत चालली असल्याच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि संयम राखण्याचे तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 वरील अडथळे हटविण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील लोकांना केले आहे.

खाद्यान्न, औषधे, इंधन व इतर अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक होण्यासाठी लोकांनी रस्त्यावरील अडथळे हटवावेत, यासाठी सिव्हिल सोसायटीच्या लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शहा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले.

इम्फाळ ते दिमापूर दरम्यान अनेक ठिकाणी लोकांनी रस्ते अडवून ठेवलेले आहेत. राज्यातील मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यास कुकी व अन्य समाजाच्या लोकांनी विरोध चालविलेला आहे. यासाठी गेल्या 3 मे रोजी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर राज्यात हिंसाचाराचा वणवा पेटला होता. हिंसाचारात 90 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news