Amazon Layoffs | ॲमेझॉनने २७ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नोकरकपातीचे भयानक वास्तव आले समोर

Amazon Layoffs | ॲमेझॉनने २७ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नोकरकपातीचे भयानक वास्तव आले समोर
Published on
Updated on

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

पुढारी ऑनलाईन : ॲमेझॉनने दोन टप्प्यांत एकूण २७ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. याबाबतची माहिती ॲमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रातून दिली आहे. अॅमेझॉनच्या वाढीसाठी खर्चात कपात आणि इतर उपाययोजनांमुळे २७ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Amazon Layoffs)

ॲमेझॉनने गेल्या महिन्यात दुसऱ्या टप्प्यात ९ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले. पहिल्या टप्प्यात कंपनीने १८ हजार नोकऱ्या कमी केल्या. अलीकडील या नोकरकपातीदरम्यान, जॅसी यांनी कर्मचार्‍यांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी हा निर्णय कंपनीच्या दीर्घकाळ वाटचालीसाठी योग्य असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे Amazon ने अशा कर्मचार्‍यांना सेपरेशन पेमेंट, आरोग्य विमा फायदे आणि एक्सटर्नल जॉब प्लेसमेंटसाठी पाठबळ दिले आहे.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

त्यांनी पुढे अधोरेखित केले की खर्च कमी करण्यासाठी, Amazon ला अनेक स्टोअर्स, व्यवसाय, Amazon Fabric आणि Amazon Care सेवा बंद करावी लागवी. त्यांनी असेही जाहीर केले की, कर्मचाऱ्यांना आता मे महिन्यापासून आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात येण्याची विनंती करण्यात आली आहे.

बिघडत चाललेल्या अर्थव्यवस्थेमुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरु आहे. यामध्ये गोल्डमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅन्ले सारख्या वॉल स्ट्रीट बँकांपासून ते Amazon आणि Microsoft सारख्या मोठ्या टेक फर्मपर्यंतचा समावेश आहे. लेऑफ ट्रॅकिंग साइटनुसार, २०२२ च्या सुरुवातीपासून टेक वर्ल्डने २८०,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यापैकी यावर्षी सुमारे ४० टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. (Amazon Layoffs)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news