पुढारी ऑनलाईन डेस्क : बर्लिन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पुष्पराजची ग्रँड एन्ट्री खूपच स्टायलिश ठरली.( Allu Arjun) यावेळचा सुंदर क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. रशिया, अमेरिका, आखाती, ऑस्ट्रेलिया आणि यूके सारख्या देशांमध्ये पुष्पा द राईजच्या प्रचंड यशाने त्याच्या चाहत्यांची संख्या आणखी वाढली आहे. ( Allu Arjun)
संबंधित बातम्या –
आता प्रतीक्षा आहे ती पुष्पा २ ची. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील पुष्पा फ्रँचायझीची लोकप्रियतेची अनुभूती पाहायला मिळाली. १५ ऑगस्ट, २०२४ रोजी बहुप्रतीक्षित पुष्पा २ द रुल प्रदर्शित होणार आहे. सध्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाने आधीच देशभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
video – Mit AA x SRK x वरून साभार