Gyanvapi Masjid : ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाच्या पूजेची परवानगी द्या

Gyanvapi Masjid : ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाच्या पूजेची परवानगी द्या

दिल्ली; पुढारी ऑनलाईन : ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Masjid) जे शिवलिंग सापडले आहे, त्याची पूजा करण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती दलाने ही याचिका दाखल केली आहे.

ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Masjid) झालेल्या सर्व्हेत येथील वजुहखाना परिसरात शिवलिंग असल्याची माहिती पुढे आली होती. तर मुस्लिम पक्षाने हे शिवलिंग नसून कारंजा असल्याचे म्हटले होते.

या याचिकेत म्हटले आहे की, "आम्हाला घटनेने दिलेल्या अधिकारांनुसार या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मिळावी. शिवलिंग असलेल्या ठिकाणाच्या बाजुलाच वजुह होतो हे योग्य नाही. हे शिवलिंग संरक्षित असले तरी भक्तांनी या ठिकाणी पूजा करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत."

ही याचिका दाखल करताना अयोघ्या खटल्याचाही आधार घेण्यात आलेला आहे."जर येथे शिवलिंग असेल तर भक्तांचा तेथे पूजेचा अधिकार राहातोच."

मे महिन्यात वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचा हा परिसर सील केला आहे.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा भाग संरक्षित केला असला तरी येथे नमाज पठणाच्या मुस्लिम समाजाच्या अधिकारवर निर्बंध घातलेले नाहीत, असा खुलासा केला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news