Alaskapox | कोव्हिडनंतर अलास्कापॉक्सचे संकट! अलास्कात दुर्मिळ व्हायरसमुळे एकाचा मृत्यू

Alaskapox | कोव्हिडनंतर अलास्कापॉक्सचे संकट! अलास्कात दुर्मिळ व्हायरसमुळे एकाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोव्हिडच्या जागतिक महामारीतून जग सावरले असतानाच काही नव्या व्हायरसची बातमी अधूनमधून येत असते. अलास्का येथे अलास्कापॉक्स या नव्या आणि दुर्मिळ व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसचे नामकरण अलास्कपॉक्स असे करण्यात आले आहे. हा व्हायरस अलास्कातील फायरबँक येथे २०१५ला सर्वप्रथम दिसला होता, त्यानंतर या व्हायरसचे ७ रुग्ण दिसून आले होते. (Alaskapox)

पण या विषाणूमुळे एखाद्या माणसाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. मृत व्यक्ती वयस्कर होता आणि त्याची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होती. "अलास्का पॉक्स हा दुर्मिळ व्हायरस आहे. सर्वसाधारणपणे या विषाणूच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना सौम्य लक्षणं दिसतात," अशी माहिती डॉ. जॉए मॅकलॉघ्नि यांनी दिली आहे. जॉए अलस्का येथील सार्वजनिक आरोग्य खात्यात साथरोग विभागाचे प्रमुख आहेत. (Alaskapox)

हा आजार लहान प्रण्यांत दिसतो. माणसामुळे या आजाराचा फैलाव होत असल्याचा पुरावा अजून मिळालेला नाही. मृत व्यक्तीला हा आजार कसा झाला, याबद्दलचीही माहिती उपलब्ध नाही. ही व्यक्ती जंगलच्या जवळ राहात होती आणि ते भटक्या मांजरांची काळजी घेत होते. पण या भटक्या मांजरांतही हा आजार दिसून आलेला नाही. यातील एखाद्या मांजराने संसर्ग झालेल्या उंदाराला मारले असेल, आणि मांजराच्या नखातून या व्हायरसने संबंधित व्यक्तीला संक्रमित केले असेल, असा तर्क मांडला जात आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news