Alaska Airlines flight | विमान हवेत असताना उडून गेला दरवाजा, सुदैवाने १७४ प्रवाशी बचावले

Alaska Airlines flight | विमान हवेत असताना उडून गेला दरवाजा, सुदैवाने १७४ प्रवाशी बचावले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अलास्का एअरलाइन्सच्या विमानात एक धक्कादायक घटना घडली आहे. हे विमान हवेत असताना विमानाचा दरवाजा (exit door) आणि फ्यूजलेजचा भाग उडून गेला. यामुळे विमानातील प्रवाशांची पाचावर धारण बसली. त्यानंतर या विमानाचे अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये शुक्रवारी (स्थानिक वेळेनुसार) इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या घटनेत कोणी जखमी झाले की नाही हे लगेच स्पष्ट झालेले नाही. पण विमान कंपनीने सांगितले की ते या घटनेची चौकशी करत आहेत.

"अलास्का एअरलाइन्सचे १२८२ हे विमान पोर्टलँड, ओरेगॉन येथून ओंटारियो, कॅलिफोर्नियाकडे जाताना ही घटना घडली. त्यानंतर हे विमान १७४ प्रवासी आणि ६ क्रू सदस्यांना घेऊन पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले," असे विमान कंपनीने सांगितले. दरम्यान, सोशल मीडियावर शेअर झालेल्या फोटोंमध्ये विमानाचा दरवाजा आणि बाजूच्या काही भाग दिसत नाही. तो उडून गेलेला दिसतो.

हे उड्डाण बोईंग 737-9 MAX द्वारे चालवले जात होते. ते दोन महिन्यांपूर्वीच धावपट्टीवर आणण्यात आले होते. त्याला नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रमाणपत्र प्राप्त झाले होते.

बोईंग एअरप्लेन्सने सांगितले की, "आम्हाला अलास्का एअरलाइन्सचे विमान #AS1282 मध्ये घडलेल्या घटनेची माहिती आहे. आम्ही अधिक माहिती गोळा करण्याचे काम करत आहोत आणि आमच्या एअरलाइन प्रवासांच्या संपर्कात आहोत. बोईंगची तांत्रिक टीम याचा तपास करेल".

FlightRadar24 च्या माहितीनुसार, हे विमान सुमारे २० मिनिटे हवेत होते आणि कमाल १६,३०० फूट उंचीवर पोहोचले. त्यावेळी विमानाचा दरवाजा उडून गेला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news