इस्त्रायली सैन्याच्या गोळीबारात अल जझिराच्या महिला पत्रकाराचा मृत्यू

इस्त्रायली सैन्याच्या गोळीबारात अल जझिराच्या महिला पत्रकाराचा मृत्यू

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

इस्त्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात अल जझिरा या वृत्तवाहिनीच्या एका ज्येष्ठ महिला पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना वेस्ट बँक प्रांतात घडली आहे. या प्रांतावर इस्रायलचा कब्जा आहे. इस्त्रायली सैन्याच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमध्ये एका ज्येष्ठ पत्रकाराची गोळ्या घालून हत्या केली असल्याची माहिती पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

शिरीन अबू अकलेह (वय ५१) असे या महिला पत्रकाराचे नाव आहे. त्या १९९७ पासून अल जझिरासाठी काम करत होत्या. त्या जेनिन निर्वासितांच्या छावणीत वृतांकन करत होत्या. या दरम्यान त्यांच्या तोंडावर एक गोळी लागली. त्यानंतर आणखी एक पॅलेस्टिनी पत्रकार अली अल-समौदी हे जखमी झाले आहेत. पण त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायलने पत्रकारांना लक्ष्य केले आहे. या घटनेच्या व्हिडिओ फुटेजमध्ये शिरीन अबू अकलेह यांनी PRESS लिहिलेले निळ्या रंगाचे जॅकेट घातलेले असल्याचे दिसते.

यावर अल-जझिराने दावा केला आहे की, इस्रायलने वेस्ट बँक येथील कारवाईदरम्यान जाणूनबुजून शिरीन अबू अकलेह यांची हत्या केली. दरम्यान, इस्रायली सैन्याने पुष्टी केली की त्यांनी जेनिन निर्वासित शिबिरात बुधवारी पहाटे एक ऑपरेशन राबवले होते, पण त्यांनी पत्रकारांना जाणूनबुजून लक्ष्य केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. "लष्कर पत्रकारांना लक्ष्य करत नाही." असे एका लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे.

लष्कराने (army) म्हटले आहे की, संशयित आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या घटनेचा तपास केला जात आहे. पॅलेस्टिनी बंदूकधाऱ्यांनी पत्रकारांवर हल्ला केला असू शकतो याचाही चौकशी केली जात आहे." दरम्यान, अल जझिराच्या पत्रकारांनी शिरीन अबू अकलेह यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

अल जझिराने जारी केलेल्या एका निवेदनातून, अबू अकलेह यांची इस्राइलनं थंड डोक्याने हत्या करण्यात आली आल्याचा गंभीर आरोप केला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने याला इस्रायली सैन्याला जबाबदार धरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news