भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा; ​​पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या अक्रम गाझीची गोळ्या झाडून हत्या

भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा; ​​पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या अक्रम गाझीची गोळ्या झाडून हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या तीन महिन्यांत भारताचे तीन शत्रू मारले गेले आहेत. लष्कर-ए-तोयबाचे माजी नेते अक्रम खान उर्फ ​​अक्रम गाझी याची गुरुवारी अज्ञात हल्लेखोरांनी पाकिस्तानातील बाजौरमध्ये गोळ्या झाडून हत्या केली. अक्रम गाझी याने २०१८ ते २०२० या काळात लष्कर भरती कक्षाचे नेतृत्व केले होते. तसेच पाकिस्तानमध्ये भारतविरोधी भाषणांसाठी त्याला ओळखले जायचे.

संबंधित बातम्या :

अक्रम हे लष्कर-ए-तोयबाचे प्रसिद्ध नाव होते. तो बराच काळ अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी होता. त्याने लष्कर भरती कक्षाचेही नेतृत्व केले होते. या वर्षी ऑक्टोबरमध्ये पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. लतीफ हा पाकिस्तानच्या गुजरांवाला शहरातील भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक होता. २०१६ मध्ये पठाणकोट एअरफोर्स स्टेशनमध्ये घुसलेल्या चार दहशतवाद्यांचा तो प्रमुख होता.

सप्टेंबरच्या सुरुवातीला, अज्ञात बंदुकधारींनी पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोटमधील अल-कुदुस मशिदीमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी कमांडरची गोळ्या झाडून हत्या केली होती. रियाझ अहमद उर्फ ​​अबू कासिम असे या दहशतवाद्याचे नाव होते. रियाझ अहमद कोटली येथून नमाज अदा करण्यासाठी आला असता, त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news