नोकरीची संधी! Akasa Air करणार १ हजार कर्मचाऱ्यांची भरती

नोकरीची संधी! Akasa Air करणार १ हजार कर्मचाऱ्यांची भरती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अकासा एअरने (Akasa Air) सुमारे १ हजार लोकांची भरती करण्याची आणि मार्च २०२४ च्या अखेरीस एकूण कर्मचारी संख्या ३ हजारांवर नेण्याची योजना आखली आहे. तसेच अकासा एअरलाइनने मार्गांचा विस्तार सुरू ठेवला आहे, असे अकासा एअरचे संस्थापक आणि सीईओ विनय दुबे यांनी म्हटले आहे. सात महिन्यांपूर्वी या एअरलाइनने विमान वाहतूक सुरु केली होती. या वर्षाच्या अखेरीस अकासा एअरने आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स सुरू करण्याची योजना आखली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत Akasa Air चे संस्थापक आणि सीईओ दुबे यांनी सांगितले की, एअरलाइन या वर्षाच्या अखेरीस तीन अंकी विमानांची ऑर्डर देईल. ७२ बोईंग ७३७ मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे आणि त्यापैकी १९ विमाने आधीच त्याच्या ताफ्यात सामील झाली आहेत. २० वे विमान एप्रिलमध्ये अकासा एअरच्या समाविष्ट होईल. त्यानंतर ते परदेशात उड्डाण करण्यासदेखील पात्र असेल.

पुढील आर्थिक वर्षात अकासा एअरने आपल्या ताफ्यात आणखी ९ विमाने सामील करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे एकूण विमानांची संख्या २८ वर जाईल. अकासा एअर दररोज ११० उड्डाणे चालवते. "आमच्याकडे सध्या २ हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस आमच्याकडे सुमारे ३ हजारपेक्षा जास्त कर्मचारी असतील. त्यात १,१०० वैमानिक आणि फ्लाइट अटेंडंट्सचा समावेश असेल," असे दुबे यांनी दिल्लीतील मुलाखतीत सांगितले.

"दिवसाला ११० उड्डाणे होत आहेत आणि उन्हाळा संपेपर्यंत आम्ही दररोज १५० उड्डाणे करू. यात सतत वाढ होत राहील," असेही ते म्हणाले. अधिकृत आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये अकासा एअरमधून ३.६१ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news