Ajit Pawar-Sharad Pawar : शरद पवार-अजित पवार भेटीवर सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या, “दोघांमध्‍ये काय…”

Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad Pawar

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी ( दि. १२) भेट झाली हाेती. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. शरद पवार-अजित पवार भेटीवर सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, "पवार साहेब आणि दादा यांच्यात काय बोलणं झाल हे मला माहित नाही." (Ajit Pawar-Sharad Pawar )

माध्‍यमाशी बाोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राजकीय भूमिका आणि कौटूंबिक भूमिका यात फरक आहे. पवार साहेब आणि दादा यांच्यात काय बोलणं झाल हे मला माहित नाही. चोरडिया आणि पवार यांचे श्रणानुबंध जुने आहेत. त्यांच्या घरी झालेल्या बैठकीत मी नव्हते आणि त्या बैठकीत काय झाले हे मला माहित नाही.

Ajit Pawar-Sharad Pawar : नवाब मलिक मला मोठ्या भावासारखे 

नवाब मलिक मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. मलिक घरी आलेत याचा आनंद झाला. त्यांच्यावर कोणी आरोप केले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. सत्याचा विजय होतो आणि मी सत्याच्या बाजुने आहे. नवाब मलिक कोणत्या गटात जातील मला माहित नाही. कोणी कोणत्या गटात जायचं ही त्यांची वैयक्तिक बाब आहे असेही सुप्रिया सुळे यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news