Ajit Pawar : “…आणि अजितदादा म्हणाले मनात आणलं तर त्यांचाच कार्यक्रम करू”; फडणवीसांना उद्देशून टोलेबाजी     

Ajit Pawar : “…आणि अजितदादा म्हणाले मनात आणलं तर त्यांचाच कार्यक्रम करू”; फडणवीसांना उद्देशून टोलेबाजी     
Published on
Updated on

 नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विधानसभेत नियम 293 अन्वये विदर्भ, मराठवाडा विकासाची चर्चा सुरु करताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज जोरदार टोलेबाजी करीत वारंवार हशा पिकविला. रात्री दहानंतरही उशिरापर्यंत ही चर्चा चालली, मात्र सभागृहात जेमतेम उपस्थिती होती. कृषिमंत्री अब्दुल सत्तार एकमेव मंत्री तर पीठासीन अध्यक्ष वैदर्भीय समीर कुणावर होते.   

अजितदादा म्हणाले, तूम्ही मुख्यमंत्री असताना होत नव्हते, आता मुद्दाम रोज स्थगिती द्यायला लावत मुख्यमंत्र्यांना बदनाम केले जात आहे का, असा सवाल त्यांनी केला. 20 वर्षे मुख्यमंत्रीपद विदर्भात होते, इच्छाशक्ती नसल्याने विकास झाला नाही, उगाच प. महाराष्ट्राला का बदनांम करता, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघत दादांनी केला. कधीकाळी ईडी, सीबीआयचा धाक दाखविला जात होता आता रोज एसआयटी लावली जात आहे, गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच कारागृहात पाठविले जाते, नाहक त्यांना, कुटुंबातील सदस्यांना त्रास होतो या शब्दांत त्यांनी अनिल देशमुख, छगन भुजबळ यांच्या संदर्भात सरकारचा समाचार घेतला. महाराष्ट्रात सर्वात ताकदवान नेता भाजपात देवेंद्र फडणवीस असताना तुम्ही ज्यांना जबाबदारी दिली ते आमचा बारामतीत 'करेक्ट कार्यक्रम 'करण्याची धमकी देतात. आमचे काम आहे या भागात आम्हाला चिंता नाही. मात्र, आम्ही मनात आणल्यास तुमचाच कार्यक्रम करू असा इशारा अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर  बावनकुळे यांचे नाव न घेता दिला. 

तुम्ही हे सर्व कसे सहन करता ?

विदर्भ वैधानिक मंडळाला मुदतवाढीबाबतही ते स्पष्ट बोलले राज्यपालांनी आमचे ऐकले नाही असे स्पष्ट केले. बेताल वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांना आवरा, तुम्ही हे सर्व कसे सहन करता? अनेकांनी सूट शिवून ठेवले कधी मंत्री करणार, एकही महिलेला मंत्री का केले नाही, बोला दिल्लीत आणि करा मंत्रिमंडळाचा विस्तार, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती आज अजित पवार यांनी मिश्कीलपणे खास शैलीत फडणवीस यांच्याकडे रोख ठेवत केली. यासोबतच गोसिखुर्द, मिहान, नागपुरातील महत्वाचे प्रकल्प स्थलांतर, मेट्रोचा तोटा आदी विविध विषयांना हात घातला. संत्रा, धान, कापूस उत्पादकांच्या हिताचे मुद्दे मांडले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news