अजब कारभार: मंदिराची जमीन लाटण्यासाठी जिवंत साधूला दाखवले मृत!

अजब कारभार: मंदिराची जमीन लाटण्यासाठी जिवंत साधूला दाखवले मृत!

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथील एक 90 वर्षीय भिक्षू जो 'जिवंत' आहे. मात्र, त्याला 'कागदोपत्री मृत' घोषित करण्यात आल्यामुळे स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी त्याला कायदेशीर लढा द्यावा लागत आहे. मंदिराची जमीन लाटण्यासाठी भूमाफियांनी महापालिकेशी संगनमत करून त्याचे मृत प्रमाणपत्र जारी करून घेण्यात आल्याचा दावा या साधूने केला आहे.

कृष्णानंद सरस्वती (वय 90 वर्षे), असे या भिक्षूचे नाव आहे. एका सर्वेक्षणानुसार भूमिहीन लोकांमध्ये ही एक सामान्य समस्या असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

टाईम्स नाऊने या संदर्भातील वृत्त दिले आहे, कृष्णानंद यांच्या म्हणण्यानुसार फिरोजाबाद येथील ह्युमन्युपूर परिसरातील एका मंदिराचे ते व्यवस्थापक आहेत. तर स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, मंदिरात एकूण 22 दुकाने आहेत आणि कृष्णानंद गेल्या 4 दशकांहून अधिक काळ ते मंदिरातच राहत होते.

स्थानिक भूमाफियांनी मंदिराची जमीन ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात फिरोजाबाद महानगरपालिकेशी संगनमत करून नोव्हेंबर 2021 त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवण्यात यश मिळवले असा आरोप कृष्णानंद यांनी केला. मला याबाबत सहा महिन्यापूर्वी माहित पडले तेव्हापासून मी जीवंत आहे हे स्थानिक अधिका-यांना पटवून देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, असे कृष्णानंद यांनी सांगितले.

"दरम्यान, बनावट कागदपत्राच्या आधारे, मी व्यवस्थापित करत असलेली मंदिराची जमीन हडप करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. म्हणून, मी या प्रकरणी महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे," अशी माहितीही कृष्णानंद यांनी दिली.
फिरोजाबादचे म्युनिसिपल कमिशनर घनश्याम मीना म्हणाले, "गेल्या वर्षी जारी केलेल्या बनावट मृत्यू प्रमाणपत्राबाबतच्या तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल." या प्रकरणातील अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news