Aishwarya Sushmita : ‘खाकी : द बिहार चॅप्टर’मधील मिता देवी रिअलमध्ये आहे इतकी ग्लॅमरस

Aishwarya Sushmita
Aishwarya Sushmita
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नीरज पांडे यांची 'खाकी : द बिहार चॅप्टर' ही वेबसीरीज नुकतेच चाहत्याच्या भेटीस आली. या वेबसीरीजमधील प्रत्येक पात्रांनी त्याच्या भूमिका जबरदस्त, सर्वोत्तम आणि रंजक साकारल्या आहेत. 'खाकी : द बिहार चॅप्टर' या बेवसीरीजमध्ये गँगवार ते पोलिस सिस्टमपर्यतचा प्रवास दाखवण्यात आलं आहे. या बेवसीरीजमधील एका खास पात्रांची भूमिकेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे, मिता देवी. ही भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या सुष्मिता ( Aishwarya Sushmita) ने साकारली आहे. यात गावात राहणाऱ्या एका सामान्य महिला 'मिता देवी'ची भूमिका तिने साकारली आहे.  या वेबसीरीजमध्ये अगदी साधी दिसणारी अभिनेत्री ऐश्वर्या सुष्मिता खऱ्या आयुष्यात मात्र, खूपच ग्लॅमरस दिसतेय. जाणून घेवूयात तिच्याविषयी…

ऐश्वर्या ( Aishwarya Sushmita) बिहारमधील दरभंगा जिल्हातील आहे. दिल्ली यूनिव्हर्सिटीमध्ये तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने मॉडलिंग केले. तिने अनेक मोठ्या फॅशन शोमध्ये रॅम्पवॉकदेखील केला आहे.

पदवीचे शिक्षणानंतर तिने मुंबई गाठली. येथे तिच्या संघर्षाला सुरूवात झाली. मुंबई आल्याने तिने अनेक ठिकाणी कामासाठी ऑडिशन दिली. अथक प्रयत्नानंतर तिला २०१६ मध्ये किंगफिशन कॅलेंडरवर 'कॅलेडर गर्ल' म्हणून झळकली. यासोबत ऐश्वर्याला स्पोर्टसचीही आवड आहे. कॉलेजमध्ये असताना ऐश्वर्या बॅडमिंटन खेळत होती.

याआधी नीरज पांडे याच्या एका बेवसारिजमध्ये ऐश्वर्या दिसली होती. यानंतर सध्या ती 'खाकी : द बिहार चॅप्टर' मध्ये दिसत आहे. या वेबसीरीजमध्ये ऐश्वर्यासोबत करण टॅकर आणि अविनाश तिवारी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. आयपीएस अधिकारी अमित लोढा यांच्या जीवनावर आधारीत ही वेबसीरिज आहे.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news