‘या’ अभिनेत्रींनी नाकारलं होतं मलायकाचं युनिक गाणं ‘छैय्या छैय्या’

छैय्या छैय्या
छैय्या छैय्या
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या 'दिल से' या हिंदी चित्रपटातील 'छैंया छैंया' हे गाणे आजही चाहत्याच्या मनात घर करून आहे. या धमाकेदार गाण्यात शाहरूखसोबत बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा जबरदस्त डान्स स्टेप पाहायला मिळाल्या. हे गाणे खास करून चालत्या रेल्वेच्या डब्यावर शूट करण्यात आलं होतं. परंतु, या गाण्यासाठी मलायकाच्या अगोदर पाच अभिनेत्रींना नकार दिला होता. यानंतर शेवटी हे गाणे मलायकाच्या झोळीत पडले आणि काही कालावधीतच ब्लॉकबस्टर ठरले.

मूव्हींग इन विथ मलायका (Moving In With Malaika) शोच्या आधी बॉलिवूड अभिनेत्री फराह खानने तिच्याशी दिलखूल्लास गप्पा मारल्या. फराहने वेळी मलायकाच्या वैवाहिक जीवनासोबत तिच्या प्रवासातील अनेक पैलू उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी फराहने ९० च्या दशकातील 'छैंया छैंया' या गाण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. 'चालत्या ट्रेनवर डान्स करताना भिती वाटली नाही का?'. 'ऐवढा धाडस कसं केलंस?' यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केल गेले. मलायकाचा 'मूव्हींग इन विथ मलायका' हा शो ५ डिसेंबरला डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

याच दरम्यान फराहने मलायकाच्या आधी 'छैंया छैंया' या गाण्यासाठी पाच अभिनेत्रींना विचारण्यात आलं होतं. यात खास करून अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, शिल्पा शिरोडकरसह आणखी २-३ होत्या. परंतु, यातील एक जण चालत्या ट्रेनवर चढण्यास घाबरली होती. तर दुसऱ्या अभिनेत्रीची डेट निर्मात्यांना मिळाली नव्हती. यानंतर शेवटी या गाण्याची ऑफर मलायका अरोराला मिळाली. आणि छैंया छैंया' हे गाणे ब्लॉकबस्टर ठरले.

शाहरुखच्या 'दिल से' या चित्रपटातील 'छैय्या छैय्या' हे गाणे निलगिरी माऊंटन रेल्वेच्या चालत्या डब्यावर शूट करण्यात आलं होते. मलायका आणि शाहरुखच्या जोडीने या गाण्याने सोशल मीडियात धुमाकूळ घातला होता. 'छैय्या छैय्या' हे गाणे ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे. तर सुखविंदर सिंग आणि सपना अवस्थी यांनी गायिले आहे. या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले आहेत.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news