Aishwarya Rai : जे चित्रपट ऐश्वर्याने नाकारले, त्यांनीच ‘या’ अभिनेत्रींचं चमकवलं नशीब

aishwarya rai
aishwarya rai
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बाजीराव मस्तानी'पासून 'भूलभुलैया' आणि 'दोस्ताना'पर्यंत ऐश्वर्या रायने अनेक मोठे प्रोजेक्ट्स केले. (Aishwarya Rai ) पण तुम्हाला माहित आहे का, ऐश्वर्या या चित्रपटाविषयी कधीच बोलली नाही. ऐश्वर्या राय बच्चन दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर परतली आहे. ऐश्वर्याचे पुनरागमनही जोरदार झाले आहे. ऐश्वर्या मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वनमधून परतली आहे. या चित्रपटात तिने नंदिनीची भूमिका साकारली होती. ऐश्वर्याला मोठ्या पडद्यावर पाहून चाहते खूप खूश आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, आतापर्यंत ऐश्वर्याने जे जे चित्रपट नाकारले, ते चित्रपट दुसऱ्या अभिनेत्रींनी केले आणि त्यांचे नशीबचं पालटलं. (Aishwarya Rai )

बाजीराव मस्तानी

संजय लीला भन्साळीचा बाजीराव मस्तानी हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाने रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांना इंडस्ट्रीत नाव कमावण्याची संधी दिली. पण, रिपोर्टनुसार, भन्साळींना ऐश्वर्याला बाजीराव मस्तानी चित्रपटात कास्ट करायचे होते. पण, ते न जमल्यामुळे त्यांनी दीपिका पादुकोणशी संपर्क साधला.

कुछ कुछ होता है

करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है'मधील टीनाची भूमिका खूप खास होती. हे पात्र खास करणने त्याची मैत्रीण ट्विंकल खन्नासाठी ठेवले होते. पण, यामध्ये टीनाची भूमिका राणी मुखर्जीला मिळाली होती. राणीच्या उत्कृष्ट कामामुळे ही भूमिका आयकॉनिक बनली. पण ट्विंकल ते राणी यांच्यातही अनेक अभिनेत्रींना टीनाची भूमिका ऑफर करण्यात आली होती हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यात ऐश्वर्या रायच्या नावाचाही समावेश आहे. मात्र तिनेही भूमिका नाकारली.

चलते चलते

एवढंच काय तर राणी मुखर्जीला ऐश्वर्याने नाकारलेला आणखी एक चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे नाव होते चलते चलते. रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याला हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता, जो तिने काही कारणास्तव नाकारला होता.

दोस्ताना

प्रियांका चोप्राचा सुपरहिट चित्रपट दोस्ताना आजही स्मरणात आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम दिसले होते. प्रियांकाच्या आधी ऐश्वर्याला ही भूमिका ऑफर करण्यात आल्याचे सांगितले जाते.

भूलभूलैय्या

विद्या बालनने मंजुलिका बनून आपल्या सर्वांनाचा सळो की पळो करून सोडले होते. भूलभुलैयामधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुकही झाले. पण विद्याच्या आधी ऐश्वर्या राय बच्चनला ही भूमिका मिळाली होती, हे तुम्हाला माहीत आहे का? रिपोर्ट्सनुसार, जेव्हा ऐश्वर्याने या प्रोजेक्टला नकार दिला, तेव्हा विद्याला ही ऑफर मिळाली होती.

राजा हिंदुस्थानी

रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चन हिला राजा हिंदुस्तानी चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. तिने जर या चित्रपटासाठी होकार दिला असता तर तिचा हा पहिलाच चित्रपट ठरला असता.

मुन्ना भाई एमबीबीएस

असे म्हटले जाते की, दिग्दर्शक राजकुमार हिरानीची ऐश्वर्या रायने डॉक्टर सुमनची भूमिका करावी अशी इच्छा होती. मात्र, दोघांमध्ये काही जमले नाही आणि मग मुन्नाभाईची सुमन ग्रेसी सिंग बनली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news