Aisha Sharma : आमदाराच्या मुलीचा नादचं खुळा! लूक पाहून चाहत्यांनी डोळे घेतले झाकून

aisha sharma
aisha sharma
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही स्टारकिड्स आपल्या आई-वडिलांप्रणाणेच अभिनय क्षेत्रात उतरतात. जसे की, श्रद्धा कपूर, अनन्या पांडे वगैरे. पण, असे काही कलाकार आहेत, ज्यांचे पालक राजकारणात कार्यरत आहेत. त्यापैकीच एक आहे-अभिनेत्री आयशा शर्मा. (Aisha Sharma) आयशाला राजकीय वारसा लाभला आहे. तिची बहिण नेहा शर्मादेखील अभिनेत्री आहे. या दोघी बहिणी बॉलीवूड अभिनेत्री आहेत. त्यांचे वडील बिहारमधील आमदार आहेत. या आमदाराच्या मुलीचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लूक समोर आला आहे. आयशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकामागोमाग काही फोटो अपलोड केले आहेत. हे फोटो पाहून खुद्द आयशा शर्माच्या चाहत्यांनी आपले डोळे झाकून घेतले आहेत. तसे इमोजी त्यांनी इन्स्टाला शेअर केले आहेत. आयसाचा कमेंट बॉक्स सेक्शन भरून गेले आहेत. (Aisha Sharma)

निळ्या रंगाच्या सर्वात हॉट मोनोकिनीमध्ये आयशाने खुर्चीवर फोटोशूट केलाय. मोकळे केस आणि हॉट फिगर फ्लॉन्ट करत तिने फोटोला कॅप्शन लिहिलीय- Collaboration is the name of the game today! ?? @camilacoelhocollection ??. आणि दुसऱ्या फोटोला तिने कॅप्शन Something about you It's like an addiction hit me with your best shot, honey ?

आयशा बोल्ड आणि हॉट

आयशा आणि नेहा शर्मा दोघी बहिणी दिसायला खूप सुंदर आहेत. आयशा बोल्ड आणि हॉट आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर खूप सारे ग्लॅमरस अंदाजातील फोटोज आणि व्हिडिओज पाहायला मिळतात. आयशाने जॉन अब्राहमचा सिनेमा 'सत्यमेव जयते'मध्ये काम केलं आहे. या चित्रटातील पानीयोसा हे गाणे खूप लोकप्रिय ठरले. हे गाणे आयशा आणि जॉन अब्राहम यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. या चित्रपटापासून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Aisha (@aishasharma25)

बिहारचे आमदार आहेत वडील

आयशाचे वडील अजीत शर्मा बिहारचे काँग्रेस नेते आहेत. आयशाला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. नेहाच्या दोन्ही बहिणी तिच्याप्रमाणेच ग्लॅमरस आहेत. सौंदर्यात आयशादेखील मोठी बहिण नेहाला टक्कर देते. पण, तिला चांगले चित्रपट मिळूनदेखील तिने तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aisha (@aishasharma25)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news