Air India: एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मिळणार लिमिटेड ‘दारू’; नियमात मोठा बदल

Air India
Air India

पुढारी ऑनलाईन: Air India : अलीकडे विमान प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अलीकडील काही घटना लक्षात घेता, एअर इंडिया या विमानप्रवासी कंपनीने आपल्या नियमात बदल केले आहेत. कंपनीने आपल्या धोरणात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. कंपनीने फ्लाइटमध्ये देण्यात येणाऱ्या अल्कोहोल सेवेतील नियमात प्रामुख्याने बदल केला आहे. यामध्ये केबिन क्रूला प्रवाशाला गरज पडली तरीही अधिकचे अल्कोहोल देण्यास नकार देण्यास सांगण्यात आले आहे.

टाटा समूहाच्या एअर इंडिया (Air India) विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमध्ये प्रवाशांच्या चुकीच्या वर्तनावर दंडही ठोठावला होता. सध्या कंपनीच्या सुधारित धोरणात नेमका काय बदल झाला हे सध्या तरी स्पष्ट करण्यात आलेले नाही.

कंपनीच्या सुधारित धोरणानुसार, प्रवाशांना क्रू मेंबर्सने सर्व्ह केल्याशिवाय मद्यपान करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. तसेच क्रू मेंबर्सनी स्वत:च मद्यप्राशन करणाऱ्या प्रवाशांची ओळख पटण्यासाठी दक्ष राहण्याचे आदेश Air India कंपनीकडून देण्यात आले आहेत. तसेच अल्कोहोलिक पेय योग्य आणि सुरक्षित पद्धतीने दिली जाणे आवश्यक आहे. यामध्ये प्रवाशांना अल्कोहोल (पुढे) देण्यास नकार देण्याचा अधिकारही समाविष्ट असल्याचा कंपनीच्या धोरणांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

एअर इंडियाच्या (Air India) प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, एअरलाइनने यूएस नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन (NRA) च्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे तसेच इतर एअरलाइन्सच्या नियमांच्या आधारे फ्लाइटमध्ये अल्कोहोल ऑफर करण्याच्या धोरणाचा समाविष्ट करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच विमान प्रवासादरम्यान मद्यप्राशन केलेली प्रकरणे ओळखणे आणि व्यवस्थापित करण्यात क्रूंना मदत म्हणून अमेरिकेच्या (NRA) ट्रॅफिक लाइट सिस्टिमचा समावेश केला गेला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news