विमानात सिगारेट ओढली…अडीशे रुपये दंडाची मागणी करणार्‍या आरोपीला जेलची ‘हवा’

विमानात सिगारेट ओढली…अडीशे रुपये दंडाची मागणी करणार्‍या आरोपीला जेलची ‘हवा’

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एअर इंडियाच्‍या विमानात सिगारेट ओढून गैरवर्तन केल्‍याप्रकरणातील आरोपीची रवानगी न्‍यायालयाने कारागृहात केली आहे. रत्नाकर द्विवेदी असे आरोपीचे नाव आहे. न्‍यायालयाने त्‍याला २५ हजार रुपयांचा दंड ठोठवला होता; पण त्‍याने २५० रुपये दंड भरणार असल्‍याचे सांगितले. त्‍यामुळे त्‍याची रवानगी कारागृहात करण्‍यात आली आहे. ( Air India Passenger )

नेमकं काय घडलं होतं ?

या प्रकरणी एअर इंडियाने जारी केलेल्‍या निवदेनात म्‍हटले होते की, प्रवाशाने विमानात सिगारेट ओढली. त्‍यानंतर अन्‍य प्रवाशांबरोबर गैरवर्तन केले. यावेळी वैमानिकाने त्‍याला समजून सांगण्‍याचा प्रयत्‍न केला मात्र आरोपीने त्‍याची विनंती धुडकावून लावली होती. अखेर संबंधित प्रवाशाविरोधात पोलिसात तक्रार देण्‍यात आली. पोलिसांनी त्‍याच्‍यावर गुन्‍हा दाखल केला आहे.

एअर इंडियाच्‍या विमानात सिगारेट ओढल्‍याप्रकरणी पोलिसांनी रत्नाकर द्विवेदी याच्‍याविरुद्ध भारतीय दंड विधान (आयपीसी) कलम ३३६ अन्‍वये गुन्‍हा दाखल केला होता. द्विवेदी याला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले. न्‍यायालयाने त्‍याला २५ हजार रुपयांचे दंड ठोठवला.

Air India, Passenger : ऑनलाईन वाचलं आहे मी २५० रुपयेच दंड भरणार…

२५ हजार रुपये दंडाला आरोपी द्विवेदी विरोध केला. त्‍याने न्‍यायालयास सागितले की, "माझ्‍यावर आयपीसी कलम ३३६ अन्‍वये गुन्‍हा दाखल झाला आहे. या कलमान्‍वये मला २५० रुपयांचा दंड ठोठावण्‍यात येतो, असे मी ऑनलाईन वाचले आहे." त्‍याची मागणी फेटाळून लावत न्‍यायालयाने त्‍याची रवानगी जेलमध्‍ये केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news