Air India News : एयर इंडिया होणार अत्याधूनिक; ‘टाटा’कडून लवकरच जगातील सर्वात मोठ्या विमान कराराची शक्यता

Air India News : एयर इंडिया होणार अत्याधूनिक; ‘टाटा’कडून लवकरच जगातील सर्वात मोठ्या विमान कराराची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : येत्या काही आठवड्यात टाटा समूह जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक विमान करारासंबधित मोठी घोषणा करु शकतो. हा करार कोटींच्या घऱात असू शकतो. त्याचबरोबर एकाचवेळी १०० हून अधिक विमान या एयरलाइनमध्ये सामिल होऊ शकतात. (Air India News ) वाचा सविस्तर बातमी.

माहितीनुसार,टाटा समूह येत्या काही महिन्यांत जगातील सर्वात मोठ्या व्यावयासिक कराराबाबत घोषणा करु शकतो. या घोषणेमुळे एअर इंडियाला काही अत्याधुनिक आणि प्रगत व्यावसायिक जेटलाइनर्सने सुसज्ज करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. येत्या काही वर्षांत लक्षणीय संख्येने नवीन विमाने आल्यानंतर जगातील सर्वात क्षमतेने ताफ्याने सुसज्ज होईल. एका वृत्त वाहिनीच्या वृत्तानुसार, टाटा समूह बोईंग आणि एअरबस या दोन्ही कंपन्यांशी लांब, मध्यम आणि लहान-मध्यम श्रेणीच्या विमानांसाठी चर्चा करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

Air India News : सर्वात मोठ्या विमान कराराची शक्यता

हा करार कोटींच्या घरात असणार आहे आणि एकाचवेळी १०० हून अधिक विमान या एअरलाइनमध्ये सामील होऊ शकतात. एअरबस A-350 सारखी अल्ट्रा-लाँग-हॉल जेटलाइनर्स, बोईंग 777X सारखी मोठ्या क्षमतेची विमाने, बोईंग 787 ड्रीमलाइनरचे प्रकार, तसेच एअरबस A-320 चे प्रकार पाहण्याची संधी विमानांच्या नवीन ताफ्यात मिळू शकते. विमान कंपनी बोईंग ७३७ मॅक्स जेटलाइनरचे प्रकार देखील विकत घेईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. लीगेसी बोईंग ७३७ विमाने आधीच एअर इंडिया एक्सप्रेसच्या सेवेत आहेत. एअर इंडियाने आपल्या भविष्यातील ताफ्याच्या या स्वरूपावर भाष्य करण्यास सध्या नकार दिला आहे. आजच्या आधी, एअर इंडियाने आपल्या विशाल ताफ्याच्या अंतर्गत भागांचे नूतनीकरण करण्यासाठी $400 दशलक्ष खर्च करण्याचे वचन दिले होते. एअर इंडियाने म्हटले आहे की त्यात आता "नवीन पिढीच्या जागा आणि सर्वोत्तम-इन-क्लास इनफ्लाइट मनोरंजन प्रणाली"चा समावेश असणार आहे.

टाटा समूहाने गेल्या वर्षी २७ जानेवारी रोजी तोट्यात चाललेली एअर इंडिया सरकारकडून ताब्यात घेतली होती. एअर इंडियाने सांगितले की, गेल्या एका वर्षात त्यांच्या एकूण विमानांची संख्या 27 टक्क्यांनी वाढून 100 झाली आहे, 16 नवीन आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू झाले आहेत. त्याचबरोबर सरासरी दैनंदिन महसूल दुप्पट झाला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news