

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मद्याच्या नशेत महिलेवर लघवी केल्याचे प्रकरण, मद्याच्या नशेत मारहाण, मद्याच्या नशेत महिला क्रू मेंबरशी हुज्जतबाजी अशा एकापाठोपाठ घटना घडल्यानंतर एअर इंडिया हवाई वाहतूक कंपनीने आपल्या मद्यसेवा धोरणात बदल केला आहे. नव्या धोरणांतर्गत क्रू मेंबर जोवर दारू देत नाही, तोवर प्रवाशांना विमानात दारू पिण्याची परवानगी नसेल.
स्वत:कडील दारू घेत असलेल्या प्रवाशांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना क्रू मेंबर्सना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांना मर्यादित प्रमाणात दारू देण्यास व अतिरेक मागणीवर नकार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डीजीसीएने एका प्रकरणात एअर इंडियाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर कंपनीतर्फे मद्यसेवेसंदर्भात ही नवी तरतूद करण्यात आली आहे. नवी इन-फ्लाईट अल्कोहोल सेवा पॉलिसी ठरविताना अन्य हवाई वाहतूक कंपन्या तसेच अमेरिकन बार अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या गाईडलाईन्सचीही मदत एअर इंडियाने घेतली.
हिरवा : प्रवासी सभ्य आहे. दारू देता येईल. पिवळा : थोडाफार नशेत असेल तर लाल : आता त्याला दारू देता कामा नये.