‘Air India खाजगीकरणापूर्वी चांगली होती’, EAC-PM चेअरमन बिबेक देबरॉय यांची सेवेबद्दल तक्रार

air india
air india

पुढारी ऑनलाइन डेस्क : Air India च्या सेवेबद्दल वारंवार कोणत्या ना कोणत्या घटना समोर येत आहे. त्यामुळे Air India च्या सेवेच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. लघुशंका प्रकरण, जेवणात दगड निघणे आदी प्रकरणानंतर आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. EAC-PM चे चेअरमन बिबेक देबरॉय यांनी Air India वर मोठी नाराजी व्यक्त केली आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण…

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (EAC-PM) अध्यक्ष बिबेक देबरॉय यांनी शुक्रवारी एअर इंडियाबद्दल तक्रार केली आहे. देवरॉय यांनी टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाच्या सेवेबद्दल तक्रार केली आणि म्हटले की एअरलाइन "खाजगीकरणापूर्वी चांगली" होती. फ्लाईट लेट झाल्यावर त्यांनी ही तक्रार केली आहे. 'मी आता एअर इंडियाला कंटाळलो आहे.'

प्रख्यात अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांनी ट्विट थ्रेडमध्ये म्हटले आहे की, 'मुंबई ते दिल्ली उड्डाण AI-687 विलंबानंतर मी एअर इंडियाला कंटाळलो आहे.' एका ट्विटला उत्तर देताना एअर इंडियाने सांगितले की, ऑपरेशनल कारणांमुळे फ्लाइटला उशीर होत आहे.

बिबेक देबरॉय यांनी ट्विट केले की, 'मी एअर इंडियाला कंटाळलो आहे. मुंबई ते दिल्ली AI 687 वर बुक केले. सुटण्याची नियोजित वेळ 16.35 (PM 4:35) होती. ETD बदलत राहते. आता 7 वाजले तरी अद्याप कोणतीही माहिती नाही. खाजगीकरणापूर्वी हे चांगले होते…"

त्यानंतर बिबेक देबरॉय यांनी त्यालाच जोडून आणखी एक ट्विट त्यांनी केले आहे. 'भविष्यात मी कधीही एअर इंडियाने प्रवास करणार नाही हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे.' ते म्हणाले- "खाजगीकरणापूर्वीच्या तुलनेत हे खूपच वाईट आहे. कोणीही जबाबदार असल्याचे दिसत नाही. दर 15 मिनिटांनी एसटीडी बदलत आहे. काउंटरवरील कर्मचारी सतत स्टेटमेंट बदलत आहेत."

अधिक विमाने मागवल्याने सेवा आपोआप सुधारत नाही, असेही देबरॉय म्हणाले. ते म्हणाले, "मुंबई-दिल्ली एआय 687 स्वर्ग नाही, नरक आहे. गेटवर चार तास. अधिक विलंब. यीस्टच्या डोससह ग्राहक सेवा." अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news