Raju Srivastava : राजू श्रीवास्तवसाठी एहसान कुरैशीने केले हनुमान चालीसाचे पठन

राजू श्रीवास्तव -एहसान कुरैशी
राजू श्रीवास्तव -एहसान कुरैशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर आहे. ९ दिवसांपासून दिल्लीच्या AIIMS मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे. (Raju Srivastava) चाहत्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत राजूची प्रकृती लवकरच ठीक होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. दुसरीकडे, राजपाल यादवने राजूसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. तर राजूचा मित्र एहसान कुरैशीने हनुमान चालीसाचे पठन केले. (Raju Srivastava)

राजूने अख्ख्या जगाला हसवलं. पण, डॉक्टरांनी त्याचा ब्रेन डेड घोषित केले आहे. कुटुंबासोबत त्याचे जवळचे मित्रदेखील प्रार्थना करत आहेत. कुणी हनुमान चालीसाचं पठन कुणी महामृत्युंजय जाप करत आहे. अभिनेता राजपाल यादवने राजूसाठी प्रार्थना केली आहे. राजपालचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचा जवळचा मित्र कॉमेडियन एहसान कुरैशीने देखील हनुमान चालीसाचे पठन केले आहे.

राजपाल यादवने राजू श्रीवास्तवसाठी एक व्हिडिओ मेसेज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. गेट वेल सून राजू माझ्या भावा. मी तुला मिस करत आहे…या कॅप्शनसोबत शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राजपाल यादव म्हणत आहे, 'भावा राजू श्रीवास्तव तू लवकर ठिक व्हायला पाहिजे. आम्ही सर्व तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत. तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत. तुझे कुटूंब, तुमचे जग, तुमचे हितचिंतक…सर्व तुझ्यासाठी प्रार्थना करत आहेत. लवकर बरे व्हा आणि बाहेर या म्हणजे आम्ही सर्व एकमेकांना मिठी मारू शकू. तुम्ही आयुष्यात सदैव आनंदी राहा आणि अशाच प्रकारे संपूर्ण जगाचे मनोरंजन करत राहा. लव्ह यू भाऊ लवकर बरे व्हा'

एहसान कुरेशीने मित्रासाठी केले हनुमान चालिसाचे पठन

राजूचा मित्र एहसान कुरेशीही करत आहे. एहसान कुरेशीने सांगितले की, त्याने राजूसाठी इतर मित्रांसोबत हनुमान चालीसाचे वाचन केले.  आता काहीतरी चमत्कार व्हायला हवा. राजूला फक्त करिश्माच वाचवू शकते. एहसान कुरेशी म्हणाला, 'डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबाला सांगितले आहे की, त्यांच्याकडून शक्य तेवढे सर्व प्रयत्न केले आहेत आणि आता फक्त काही करिष्माच राजू श्रीवास्तवला वाचवू शकतो. त्याच्या मृत्यूची बातमी खोटी आहे. राजू ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. आम्ही सर्व मित्र त्याच्यासाठी प्रार्थना करत आहोत. तो आता एम्समध्ये आहे आणि मी विनंती करतो की, सर्वांनी प्रार्थना करावी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news