मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात

पाथर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, त्यांना फोन द्या. मी मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, असा धमकी देणारा फोन आज गुरुवारी दुपारी 2 वाजता डायल 112 या प्रणालीवर आला. त्यामुळे पाथर्डी पोलिसांची आणि मुंबईत मंत्रालय सुरक्षा यंत्रणेची प्रचंड धावपळ उडाली. दरम्यान हा फोन करणारी व्यक्ती शेवगाव तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पाथर्डी पोलिसांनी अटकही केली आहे. बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे (वय-34, रा. हसनापूर, ता. शेवगाव) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाळकृष्ण याने हा फोन गेल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे आणि मी मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, असे तो सांगत होता.

दरम्यान, त्याला आधी शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर पाथर्डी पोलिसांनी शेवगाव पोलिस ठाण्यात जावून त्याला अटक केली. आरोपी ढाकणे नशेत असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. पोलिस नाईक नीलेश म्हस्के यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध पाथर्डीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मंत्रालय उडवून देण्याच्या धमकीचा हा फोन आला असताना मंत्रालयाशेजारी सुरू असलेल्या मेट्रोच्या ब्लास्टिंगमुळे उडालेले दगड मंत्रालयाच्या इमारतीवर येऊन धडकले. यामुळे मंत्रालयाच्या काचा तर फुटल्याच पण पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या काही गाड्यांचेही नुकसान झाले. या दोन घटनांनी मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा सावध झाली असताना मंत्रालयासमोरील प्रशासकीय इमारतीत एका तरूणाने चाकू बॅगेत ठेवून घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला अटक करण्यात आली. बॉम्बशोधक पथकाला तत्काळ पाचारण करण्यात आले. या पथकाने संपूर्ण मंत्रालय चाळून काढले. पण ही केवळ धमकी होती, हे स्पष्ट झाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news