Agniveer Akshay Gawate : शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत : मुख्यमंत्री

Agniveer Akshay Gawate : शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत : मुख्यमंत्री
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना अग्निवीर असलेले अक्षय लक्ष्मण गवते यांचे (Buldhana Agniveer Akshay Gawate) २० ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अक्षय गवते हे शहीद झालेले पहिले अग्निवीर आहेत. जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये ते कर्तव्य बजावत होते. अक्षय हे मूळचे बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई या गावचे आहेत. त्यांनी नऊ महिने सैन्यात कर्तव्य बजावले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ( Agniveer Akshay Gawate)

संबंधित बातम्या 

 Agniveer Akshay Gawate : दहा लाखांची मदत : मुख्यमंत्री

सीएमओ महाराष्ट्र या 'X' अकाउंटवर पोस्ट करत शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. शहीद अक्षयच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की,

"सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. जवान अक्षय गवते हे चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली."

शहीद झालेले पहिले अग्निवीर

जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये कर्तव्य बजावत असताना अग्निवीर अक्षय गवते यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अक्षय गवते हे शहीद झालेले पहिले अग्निवीर आहेत.अक्षय हे मूळचे बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई या गावचे आहेत. अग्निवीर अक्षय गवते यांच्या पश्चात आई-वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. सियाचीन ही काराकोरम पर्वतरांगातील २० हजार फूट उंचीवरील जगातील सर्वांत उंच रणभूमी आहे, जिथे सैनिकांना कर्तव्य बजावताना हाडे गोठवणारी थंडी आणि हिमवादळांशी तोंड द्यावे लागते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news