पुढारी ऑनलाईन डेस्क: न्यू जनरेशन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-प्राइमची उड्डाण चाचणी यशस्वी पार पडली आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. APJ अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली. भारतीय लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDO च्या संयुक्त विद्यमानाने या नवीन पिढीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी उड्डाण करण्यात आल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. (Agni Prime Missile)
अग्नी-प्राइम क्षेपणास्त्र प्रक्षेपणादरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडचे प्रमुख, DRDO आणि भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, SFC आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले. अग्नी क्षेपणास्त्राचा यशस्वी विकास आणि समावेश हे भारतीय सशस्त्र दलांसाठी एक उत्कृष्ट बल गुणक ठरेल, असा विश्वास राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला. (Agni Prime Missile)
नव्याने चाचणी घेण्यात आलेले 'अग्नि प्राइम' हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र उच्च-तीव्रतेचे स्फोटक थर्मोबॅरिक अथवा आण्विक शस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत 'अग्नी प्राइम' हे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र अग्नी सीरीजमधील आधुनिक, मारक, अचूक आणि मध्यम पल्ल्याचे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र आहे. (Agni Prime Missile)
'अग्नी प्राइम' बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे, ज्याचा पल्ला सुमारे १२००-२००० किमी आहे. हे क्षेपणास्त्र अचूकतेसाठी ओळखले जाते. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणार्या या क्षेपणास्त्रावर 1500 ते 3000 किलो वारहेड्स वाहून नेले जाऊ शकते. याचे वजन सुमारे 11 हजार किलोग्रॅम आहे. अग्नी क्षेपणास्त्र मालिकेतील हे सर्वात नवीन आणि सहावे क्षेपणास्त्र आहे. या कार्यक्रमांतर्गत पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, नाग आणि आकाश ही क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली आहेत.
हे ही वाचा: