Ranbir Kapoor : ‘अॅनिमल’च्या यशानंतर रणबीर कपूरचा भाव वधारला

Ranbir Kapoor
Ranbir Kapoor

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) स्टारर 'अॅनिमल' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. या सिनेमाने जगभरात ९०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. अॅनिमलच्या यशानंतर रणबीरचा भाव चांगलाच वधारला आहे.

संबंधित बातम्या 

आता रणबीरच्या ( Ranbir Kapoor ) कारकिर्दीला चांगलीच भरारी मिळाली आहे. त्यामुळे त्याने आपल्या मानधनात वाढ केली असल्याची माहिती समोर आली आहे. रणबीरने त्याच्या मानधनात दुपटीहून जास्त वाढ केली आहे. 'अॅनिमल' च्या यशानंतर रणबीरच्या लोकप्रियेतत वाढ झाली आहे. रणबीरने त्याचे मानधन ३० कोटी रुपयांवरून वाढवून ६५ कोटींच्या जवळपास केले आहे; मात्र याला रणबीरने अद्याप दुजोरा दिलेला नाही, असे सांगितले जात आहे.

मानधनवाढीबाबत त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडेही अद्याप काहीच माहिती नाही. यापूर्वीही रणबीरने 'संजू' या सिनेमाच्या यशानंतर मानधनात वाढ केल्याचे समोर आले होते. त्यावेळी रणबीरने जाहिरातीसाठीचे मानधन ८ कोटींहून १२ कोटी केले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news