Bigg Boss 17 : 'बिग बॉस १७' चा विजेता कोण होणार? ड्रामा क्विन राखीनं केली भविष्यवाणी (video) | पुढारी

Bigg Boss 17 : 'बिग बॉस १७' चा विजेता कोण होणार? ड्रामा क्विन राखीनं केली भविष्यवाणी (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सध्या दोघेही ‘बिग बॉस १७’ ( Bigg Boss 17 ) च्या घरात पोहोचले आहेत. या घरात ‘विकेंड वॉर’ सुरू असून यातील स्पर्धकांना वेगवेगळ्या टास्कचा सामना करावा लागत आहे. दरम्यान बिग बॉस घरात अंकिता आणि विकीमध्ये जोरदार भांडण होत आहे. यात अंकिता विकीचा अपमान करत असल्याने तिची सासूदेखील तिचा तिरस्कार करत आहे. याच दरम्यान अंकिताची मैत्रीण आणि ड्रामा क्विन, अभिनेत्री राखी सांवतने बिग बॉसची खरी विजेती कोण होणार? यांची भविष्यवाणी केली आहे. तर दुसरीकडे अंकिता विकीला कायमचे सोडून देणार असल्याचे कबूल केलं आहे. यानंतर विकी आणि अंकिताचा घटस्फोट होणार का? याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

संबंधित बातम्या 

नुकतेच ड्रामा क्विन आणि अभिनेत्री राखी सांवतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात राखीने अंकिताच्या सासूवर भडकत तिला चांगलेच खरेखोटे सुनावले आहे. या व्हिडिओत राखी मोकळ्या केसांसोबत आकाशी रंगाच्या टिशर्टमध्ये दिसत आहे.
‘हॅलो फ्रेंड्स, मला अंकिताच्या सासूला सांगायचे आहे की, सासू पहिल्यांदा सून असते. यामुळे तुम्ही सुनेला समजावून घ्या. पती-पत्नीमध्ये वाद होत असतात, तुम्ही कशाला मध्ये पडता. कालांतराने हे भांडण मिटतात. तुम्ही आपलं खा-प्या, मजा करा, शांत बसा. सासू मॉ. अगाच दोघांच्या मध्ये कैकयी बनू नका, असे राखीने या व्हिडिओत म्हटलं आहे. याच दरम्यान तिने उद्याची ‘बिग बॉस १७’ ची विजेती अंकिताच होणार असल्याची भविष्यवाणीदेखील केली आहे. यावरून खरोखरंच ‘बिग बॉस १७’ ची विजेती अंकिता होणार आहे का? याची सोशल मीडियावर रंगली आहे.

दरम्यान ‘बिग बॉस १७’ च्या ( Bigg Boss 17 ) अंकिता आणि विकीचे वाद काही केल्यास मिटत नाहीत. नुकताच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये सुरूवातीला अंकिता विकीला त्याचे प्लेट धुण्यास सांगते. यावर विकी ‘तु मला काय सांगतेस?’, ‘माझी बॉस आहेस का?’ असे तिला प्रत्युत्तर दितो. यानंतर विकी प्लेट धुण्यास जातो. मात्र, अंकिताशी याविषयावर विकी पुन्हा वाद घालतो. शेवटी अंकिता त्याला कंटाळून ‘माझचं चुकलं, मी तुला बोलले. यापुढे असे होणार नाही, मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईन’ असे म्हणत ती रडत-रडत घराच्या बाहेर येते. यासर्व गोष्टी बिग बॉसच्या प्रोमो दिसत आहेत. मात्र, या वादाची ठिगणी त्याच्या वैवाहिक जीवनावर पडणार की नाही?, आणि राखी सांवतच्या म्हणण्यानुसार, अंकिता विग बॉसची विजेती होणार की नाही? याबद्दलची माहिती अध्याप समोर आलेली नाही.

(VIDEO : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button