Rahul Gandhi in Manipur : मणिपूरमध्ये ताफा रोखल्यानंतर राहुल गांधी म्हणाले…

Rahul Ghandhi in Manipur 2
Rahul Ghandhi in Manipur 2

नवी दिल्ली/इम्फाळ, 29 जून, पुढारी वृत्तसेवा : Rahul Gandhi in Manipur : काँग्रेस नेते राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर आहेत, मात्र त्यांच्या दौऱ्यावरून राजकारण आता तापले आहे. गुरूवारी सकाळी राहुल चुराचंदपूरच्या दिशेने जात असताना त्यांच्या ताफ्याला बिष्णुपूर येथेच थांबवण्यात आले. त्यांना हेलिकॉप्टरने जाण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले.

तेव्हापासून काँग्रेस आणि भाजपमध्ये खडाजंगी सुरू झाली. काँग्रेसने भाजपवर राहुल यांना रोखल्याचा आरोप केला, तर भाजपने पलटवार केला की, मणिपूरच्या लोकांनीच राहुल यांच्या भेटीला विरोध केला आहे. मात्र, या सर्व प्रकारानंतर राहुल गांधी हेलिकॉप्टरने चुरचंदपूरच्या छावणीत पोहोचले आणि तेथे उपस्थित लोकांची भेट घेतली.

Rahul Gandhi in Manipur : काफिला थांबवल्यावर राहुल गांधी काय म्हणाले?

चुरचंदपूरमध्ये लोकांशी भेट आणि संवाद साधल्यानंतर राहुल गांधींनीही ट्विट करून त्यांचा ताफा थांबवल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मी मणिपूरच्या माझ्या सर्व बंधू-भगिनींना ऐकण्यासाठी आलो आहे. सर्व समाजातील लोक खूप प्रेमळ आहेत. सरकार मला रोखत आहे हे दुर्दैवी आहे. शांतता ही आमची एकमेव प्राथमिकता असली पाहिजे."

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news