सिसोदिया यांच्यानंतर ‘आप’चे हे ३ नेते तपास यंत्रणांच्या रडारवर

सिसोदिया यांच्यानंतर ‘आप’चे हे ३ नेते तपास यंत्रणांच्या रडारवर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन हे आपचे दोन महत्त्वाचे नेते सध्या कोठडीत आहेत. दरम्यान, आपच्या या दोन्ही नेत्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. याचबरोबर दिल्ली सरकारमधील आणखी काही नेते देखील तपास यंत्रणेच्या रडारावर आहेत. सध्या या नेत्यांची कोणतीही चौकशी जरी सुरू नसली, तरी त्यांच्यावर गंभीर आरोप असल्याने भितीची टांगती तलवार कायम आहे.

सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया यांच्याशिवाय आपचे कैलाश गेहलोत, राघव चड्ढा आणि दिल्ली संवाद आयोगाच्या प्रमुख जस्मिन शाह हे प्रमुख देखील तपास यंत्रणेच्या रडारावर आहेत. आपचे मंत्री मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळा प्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने चार मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दरम्यान सिसोदिया यांनी मंत्रिमंडळातील आपल्या पदांचा राजीनामा मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे सुपूर्त केला असून केजरीवाल यांनी तो स्विकारला आहे.

सिसोदिया यांच्याकडे अर्थ मंत्रालय आणि वित्त मंत्रालय अशा एकूण 18 विभागांची जबाबदारी होती. आता हे खाते दिल्ली सरकारच्या इतर मंत्र्यांमध्ये वाटण्याची चर्चा आहे. यामध्ये दिल्ली सरकारचे मंत्री कैलाश गेहलोत हे अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे मानले जातात. वित्त विभागासह अनेक महत्त्वाची खाती त्यांच्याकडे सोपवली जाऊ शकतात. मात्र गेहलोत यांच्यावर यापूर्वीही अनेक खटले प्रलंबित आहेत. म्हणजेच मनीष सिसोदिया यांच्यानंतर कैलाश गेहलोत यांनाही सीबीआयच्या तपासाचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपचे कैलाश गेहलोत यांचीही चौकशी

अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्यानंतर कैलाश गेहलोत हे सरकारमधील सर्वात ज्येष्ठ आणि महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांच्याकडे सध्या दिल्ली ट्रान्सपोर्टसह इतर अनेक महत्त्वाची खाती आहेत. पण कैलाश गेहलोत यांच्यावर आधीच डीटीसी बस खरेदी घोटाळ्याचे आरोप आहेत. डीटीसी बस खरेदीतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

राघव चढ्ढा यांच्यावर तपासाचा तगादा सुरूच

पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांनी आप पक्षाच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली आणि पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. यानंतर त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाचे कामही सांभाळले आणि तेथेही पक्ष आपली उपस्थिती नोंदवण्यात यशस्वी ठरला. पण राघव चढ्ढा दिल्ली जल बोर्डात महत्त्वाच्या पदावर असताना जल बोर्डात आक्षेपार्ह हेराफेरी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. जुने पाईप बदलून नवीन टाकण्याच्या प्रकरणातही घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चढ्ढा कोणत्याही क्षणी तपास यंत्रणेच्या कक्षेत येऊ शकतात.

जस्मिन शाह यांच्यावर देखील तपास यंत्रणेची नजर

आम आदमी पक्षाच्या रणनीतीकारांमध्ये दिल्ली संवाद आयोगाचे माजी अध्यक्ष जस्मिन शाह यांचे नाव ठळकपणे घेतले जाते. परंतु लेफ्टनंट गव्हर्नर यांनी आयोगाच्या कामकाजात गंभीर अनियमितता आढळून आली असल्याचा आरोप करत, आयोगाला घटनाबाह्य संस्था म्हटले आहे. याप्रकरणी आपचे जास्मिन शाह देखील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news