Aam Aadmi Party
Aam Aadmi Party

रस्त्यांवर खड्डे असूनही परिसर स्मार्ट कसा? आम आदमी पक्षाचा प्रशासनास सवाल

Published on

बाणेर; पुढारी वृत्तसेवा: बालेवाडी-बाणेर परिसराचा स्मार्ट सिटी उपक्रमात समावेश करण्यात आला आहे. या भागातील अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. तसेच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, तरीही हा परिसरात 'स्मार्ट' कसा, असा सवाल आम आदमी पक्षाने उपस्थित केला आहे. पक्षाच्या वतीने बालेवाडीतील खड्डे पडलेल्या व अर्धवट रस्त्यांच्या कामांचा सर्व्हे करण्यात आला असून, ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

बाणेर-बालेवाडी परिसराच्या विकासासाठी पूर्वी जेएनएनयूआरएम, तसेच 'स्मार्ट सिटी'सह विविध योजनांचे हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीही या भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पदपथांवर अतिक्रमणेही झाली आहेत, असे पक्षाचे सुदर्शन जगदाळे व आबासाहेब कांबळे यांनी सांगितले.

एसकेपी कॅम्पस ते बालेवाडी मुख्य रस्ता ते बालेवाडी फाटा, कॉकॉर्ड पोटिया लाइन (9 मीटर), रवींद्रनाथ टागोर शाळेसमोरील रास्ता (30 मीटर), कोणार्क पार्क सोसायटीसमोरील रस्ता (9 मीटर), राधा-कृष्ण सोसायटीसमोरील रस्ता (9 मीटर), गोल्ड कॅस्टेलसमोरील रस्ता (9 मीटर), एसकेपी कॅम्पससमोरील रस्ता (30 मीटर), अर्चवेसमोरील रस्ता (30 मीटर), दसरा चौक (30 मीटर), कम्फर्ट झोनसमोरील रस्ता (24 मीटर), ब—वुरीवासमोरील रस्ता (24 मीटर बालेवाडी गावठाणातील रस्ता (24 मीटर) बालेवाडी फाटा (24 मीटर), या रस्त्यांची कामे अपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news