Spy Balloon : अमेरिकेतील हवाईत दिसला पुन्हा स्पाय बलून

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेतील हवाई बेटांवरील होनोलूलू शहरात 50 हजार फूट उंचीवर एक स्पाय बलून आढळला आहे. याआधी 2 फेब्रुवारीला अमेरिकेतील मोंटाना शहरात चिनी स्पाय बलून दिसला होता. कॅरोलिनाजवळ 5 फेब्रुवारी रोजी अमेरिकन हवाई दलाने तो नष्ट केला होता. (Spy Balloon)

अमेरिका-कॅनडा सीमेजवळ 13 फेब्रुवारीला एक उडणारी वस्तू दिसली होती. अमेरिकेच्या हवाई दलानेही ती पाडली. पुन्हा 12 फेब्रुवारी रोजी कॅनडामध्ये संशयास्पद उडणारी वस्तू दिसली कॅनडाच्या युकॉन प्रांतात 12 फेब्रुवारी रोजी एक दंडगोलाकार आकाराची उडणारी वस्तू दिसली. तत्पूर्वी 10 फेब्रुवारी रोजी अलास्कामध्ये उडणारी वस्तू दिसली अमेरिकन फायटर जेटने ती खाली पाडली होती.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news